शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरांनी पदभार स्विकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 15:29 IST

आदेश प्राप्त होताच आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जावून डॉ. कल्याणकर यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. यावेळी डॉ. कल्याणकर यांनी प्रथम पुष्पगुच्छे देऊन नार्वेकरांचे स्वागत करून खुर्चीत विराजमान केले

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी देखील भेट घेऊन नार्वेकर यांची पुष्पगुच्छे देऊन स्वागत ध्वजारोहण आता नवे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या उपस्थितीतठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला ‘डिजिटल चॅम्पियनशिप’ डॉ. कल्याणकर यांनी प्राप्त करून दिली

ठाणे : जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची बदली झाली असून ते आता मंत्रालयात उद्योग, कामगार विभागाची जबाबदरी पार पाडणार आहेत. तर त्यांच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहसचिव राजेश नार्वेकर यांची बदली झाली. मंगळवारी दुपारी त्यंनी ठाणे जिल्हाधिकरी पदाचा पदाभार ही स्विकारला.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ७१ व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण आता नवे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडेल. आदेश प्राप्त होताच आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जावून डॉ. कल्याणकर यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. यावेळी डॉ. कल्याणकर यांनी प्रथम पुष्पगुच्छे देऊन नार्वेकरांचे स्वागत करून खुर्चीत विराजमान केले. यानंतर पालकमंत्र्यांनी देखील भेट घेऊन नार्वेकर यांची पुष्पगुच्छे देऊन स्वागत केले. १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर नव्या जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती ही ठाणेकरांसाठी देखील नवी पर्वणीच असल्याचे शहरातील दिग्गजांकडून ऐकायला मिळत आहे.राज्यात सर्वाधिक प्रगतीच्या वाटेवर ठाणे जिल्हा एकमेव जिल्हा आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या कामकाजाची जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी ठरलेले नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी पदी विराजमान झाल्यामुळे ठाणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा दुग्ध शर्करा योग मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांचे सहसचीव पदाची जबाबदारी पार पाडलेले नवे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या नियंत्रणातील ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला आता चारचांद लागणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांर्गत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला ‘डिजिटल चॅम्पियनशिप’ डॉ. कल्याणकर यांनी प्राप्त करून दिली. याशिवाय अनधिकृत रेती उत्खनन करणाºया रेतीमाफियांवर सडेतोड कारवाई करून राज्यात सर्वाधिक दंड वसुली त्यांनी करून दिली आहे. डॉ. कल्याणकर, यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात पहिले कौशल्य विकास केंद्र ठाणे येथे प्रथम सुरू झाले. दुपारी येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये डॉ. कल्याणकर यांचा निरोप समारंभही त्वरीत पार पडला. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांचा सहपत्नीक सत्कार केला.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी