शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी एक्स्प्रेस दररोज सोडा- कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:27 IST

रेल्वेने शनिवारपासून सुरू केलेल्या राजधानी एक्स्प्रेसचे कल्याण रेल्वेस्थानकात भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले.

डोंबिवली : रेल्वेने शनिवारपासून सुरू केलेल्या राजधानी एक्स्प्रेसचे कल्याण रेल्वेस्थानकात भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. खासदार कपिल पाटील यांनी या गाडीसाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान, या गाडीचे आरक्षण पहिल्या पाच तासांतच फुल्ल झाल्याने ही गाडी आठवड्यात दोन वेळेऐवजी दररोज सोडावी, अशी मागणी रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही गाडी कल्याण स्थानकात दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी दाखल झाली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी, महापालिकेतील पक्षाचे गटनेते वरुण पाटील, नगरसेविका वैशाली पाटील, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, परिवहन समितीचे सदस्य कल्पेश जोशी, भिवंडी तालुका सरचिटणीस राम माळी, युवा नेते नितीन कारभारी, ठाणे विभागाच्या महिला आघाडी अध्यक्षा शुभा पाध्ये व कार्यकर्त्यांनी या गाडीचे स्वागत केले.कल्याणहून रेल्वेने दिल्लीला जाण्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. अनेक गाड्यांना ३० तासांहून अधिक वेळ जातो. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. वेळ वाचवण्यासाठी अनेक प्रवासी पश्चिम रेल्वेमार्गाने दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करतात. त्यासाठी कल्याणहून मुंबई सेंट्रल गाठण्यासाठी त्यांना किमान दोन तास अगोदर निघावे लागते. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेमार्गावरही राजधानी एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी पाटील यांनी केली होती. या गाडीचा फायदा ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे.>गाडीचे वेळापत्रकराजधानी एक्स्प्रेस दरबुधवारी व शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ती दुसºया दिवशी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी दिल्लीत पोहोचणार आहे. दिल्लीहून ही गाडी दरगुरुवारी आणि रविवारी दुपारी ३.१५ वाजता सुटून दुसºया दिवशी सकाळी ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या गाडीने कल्याणहून दिल्लीला १८ तास ४२ मिनिटांत पोहोचता येईल. या गाडीला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी, आग्रा कॅन्टोन्मेंट येथे थांबे आहेत.