शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यामागे राजमुद्रा, अंंबरानाथमधील शिवप्रेमींनी घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 00:10 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर राजमुद्राचे शिल्प हे मागच्या बाजूला बसवण्यात आले आहे, त्यामुळे ही राजमुद्रा दृष्टिक्षेपात येत नाही.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती मेघडंबरीचे काम करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळाही दिमाखात साजरा करण्यात आला. मात्र, महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर लोकार्पणाचे जे फलक लावले आहेत ते फलक काढून त्या ठिकाणी राजमुद्रा लावण्याची मागणी करण्यात येत आहे. या चौथऱ्यावर राजमुद्रा ही मागच्या बाजूला लावल्याने काही शिवप्रेमींनी त्यावर आक्षेप घेत ही मुद्रा दर्शनी भागात लावण्याची मागणी केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर राजमुद्राचे शिल्प हे मागच्या बाजूला बसवण्यात आले आहे, त्यामुळे ही राजमुद्रा दृष्टिक्षेपात येत नाही. त्याउलट लोकार्पणाचे फलक हे दर्शनी भागात लावले आहेत. या फलकावर राजकीय नावे असून ते फलक मागच्या बाजूला बसवण्याची मागणी केली जात आहे. राजमुद्रेचा आदर करून ती राजमुद्रा महाराजांच्या पुतळ्याखालील चौथऱ्यावर दर्शनी भागातच लावण्यात यावी, अशी मागणी छत्रपती शासन प्रतिष्ठान या सामाजिक संस्था आणि मनसेतर्फे करण्यात आली आहे. लोकार्पण याच कोनशिलेवर कोणाची नावे आहेत, हा वादाचा मुद्दा नसून राजमुद्रा दर्शनी भागात लावावी, एवढी माफक अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.दर्शनीभागात पुढाऱ्यांची नावेअंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेल्या कोनशिलेवर अनेक पुढाऱ्याची नावे आहेत. त्यात सर्वात खाली उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांचेही नाव कोरण्यात आले आहे. शेख यांचे नाव काही व्यक्तींनी काळा रंग लावून बुजवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे राजकारण तापले आहे.शेख यांनी या लोकार्पण सोहळ्यात खासगी बांधकाम व्यावसायिकाचे नाव कोनशिलेवर लावण्यात विरोध दर्शवला होता. त्यावरून मोठा वादही निर्माण झाला होता. त्यातच आता शेख यांच्या नावावर काळा रंग लावल्याने तो पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज