शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

नव्या पिढीला राज कपूर यांनी स्वप्ने दाखविली: अशोक हांडे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: February 10, 2025 15:45 IST

सुयश कला-क्रीडा मंडळाच्यावतीने श्री सिद्धिविनायक मंदिर व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प हांडे यांनी `राज कपूर यांची जन्मशताब्दी ' या विषयावर गुंफले.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : स्वातंत्र्यानंतर नव्या पिढीला राज कपूर यांनी स्वप्ने दाखविली. रशियात मार्क्स-लेनिन अस्तंगत झाले. पण आजही राज कपूर यांची आठवण काढली जाते. ते कायम सामान्यांमध्ये रमले. इतकेच नव्हे तर सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना अर्पण केला, अशी माहिती प्रसिद्ध गायक व निर्माते अशोक हांडे यांनी दिली. राज कपूर आपल्या आयुष्यात आले, हे भाग्य आहे. आता त्यत्चीचा चित्रपट गीते व चित्रपटाचा ठेवा हा पुढील पिढीला पोचविणे, ही आपली त्यांच्याप्रती कृतज्ञता राहील,त्शा भावना हांडे यांनी व्यक्त केल्या.

सुयश कला-क्रीडा मंडळाच्यावतीने श्री सिद्धिविनायक मंदिर व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प हांडे यांनी `राज कपूर यांची जन्मशताब्दी ' या विषयावर गुंफले. यावेळी व्यासपीठावर गायक संकेत जाधव यांच्या सोबतीने हांडे यांनी रसिकांना राज कपूर यांच्या चित्रपटातील विविध गीते गात व आठवणी सांगत मंत्रमुग्ध केले. प्रसंगी १० वर्षांच्या ग्रिहिथा विचारे हिचा हांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चित्रपटाच्या माध्यमातून परदेशात भारतीय संस्कृती व भारतीय विचारधारा पोचविणारे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक राज कपूर हे भारताचे पहिले सांस्कृतिक राजदूत आहेत, असे मत हांडे यांनी पुढे बोलताना व्यक्त केले. भारतीय चित्रपटावर अविस्मरणीय ठसा उमटविलेल्या राज कपूर यांनी भारतातील रसिकांना मानवतेचा संदेश देण्याबरोबरच प्रेम करायलाही शिकविले. तर संघर्ष करीत असतानाच संघर्षावर हसत मात करण्यासाठी प्रेरणा दिली, असे प्रतिपादन त्यांनी केले.

आपल्या प्रत्येक चित्रपटातून राज कपूर यांनी सामाजिक संदेश व सामान्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील अनुभवांचे चित्रण दाखविले. १९७० च्या दशकात भारतीय चित्रपटांची अभिरुची बदलल्याचे लक्षात आल्यावर बॉबी, सत्यम शिवम सुंदरम, राम तेरी गंगा मैली असे चित्रपट तयार केले. प्रत्येक चित्रपट व गीतामध्ये राज कपूर यांनी मेहनत घेतली. `मेरा नाम जोकर' चित्रपट तयार करताना भव्यतेची आस धरली. परंतू, तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी आपटला. भविष्यात या चित्रपटातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न कपूर कुटुंबियांना मिळाले, अशी माहिती हांडे यांनी दिली.

टॅग्स :Raj Kapoorराज कपूर