शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी पिकनिक पोस्टपोन्ड

By admin | Updated: June 21, 2016 01:09 IST

पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाल्याने अनेक सहलप्रेमींच्या पावसाळी सहलीच्या बेतांना सुरुवात झाली आहे. तसाही पावसाळा लांबल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला होता

प्रज्ञा म्हात्रे,  ठाणेपावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाल्याने अनेक सहलप्रेमींच्या पावसाळी सहलीच्या बेतांना सुरुवात झाली आहे. तसाही पावसाळा लांबल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला होता. मात्र, आता नुकतीच पावसाने हजेरी लावल्याने वीकेंड्सना पर्यटनस्थळी झुंबड उडण्याची शक्यता आहे.पावसाळ्यात निसर्ग बहरलेला असतो. हा बहरेलाला निसर्ग सहलप्रेमींना खुणावत असतो. त्यामुळे जून महिना सुरू झाला की सहलप्रेमींच्या पिकनिक प्लॅनला उधाण येते. सोशल साईट्सपासून अगदी मित्रांच्या कट्ट्यावर सहलींच्या चर्चा रंगू लागतात. मग जवळच्या ठिकाणी जायचे का लांबच्या, धबधबे, फार्महाऊसला जायचे की, ट्रेकिंग, रिसॉर्टला यावर गप्पा सुरू होतात. लोणावळा, भंडारदरा, कोंडेश्वर, वदप, भुशी डॅम, भिवपुरी, माशळेज, पळसदरी, माथेरान तर ट्रेकिंगसाठी गड - किल्ले अशा अनेक ठिकाणांची निवड सुरू होते. या सर्वच ठिकाणी जाण्यासाठी सहलप्रेमी उत्सुक आहेत. परंतु, निम्मा जून उलटला तरी पावसाचे चिन्ह नसल्याने त्यांच्या प्लानला कात्री लागली. पहिला पाऊस गेल्या आठवड्यात झाला खरा परंतु, काही वेळापुरताच. पहिल्या पावसानंतर पाऊस गायब झाला आहे. तो अद्याप बरसायचे काही नाव घेईना. गेल्या वर्षीदेखील जून महिन्यातील विकेण्ड कोरडेच गेले होते आणि शेवटच्या आठवड्यात धुवाधार पावसाने एन्ट्री केली होती. मात्र यंदाही सहलप्रेमींच्या प्लानवर पाणी फेरले गेले असून पावासाची वाट पाहण्याशिवाय कोणता पर्याय उरलेला नाही. पाऊस लांबल्याने आमच्या पूर्ण ग्रुपचा हिरमोड झाला आहे. यंदाच्या उन्हाने हैराण झाल्याने आम्ही पावसाचा आनंद लुटण्यासाठी पिकनिकला जाण्याचे ठरविले होते. परंत, मान्सूनच्या लेट एन्ट्रीमुळे सर्वच प्लॅनवर पाणी फिरले आहे. लोणावळा खंडाळ््याच्या निसर्गाचा, धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागेल. चातकाप्रमाणे आम्हीदेखील पावसाची वाट पाहत आहोत.- अजिंक्य गावकरनेहमीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात पिकनिकला जाण्याचे ठरविले खरे, परंतु पावसाने दांडी मारल्याने हिरमोड झाला आहे.- संतोष शर्मापाऊस पडत नसल्यामुळे पिकनिकवर पाणी तर फिरले गेलेच. पण या अवघ्या महाराष्ट्राचीदेखील चिंता वाटत आहे. पाऊस लवकर यावा आणि पाण्याची आणि पिकनिकची तहान भागवावी.- पुष्कर रासमपावसाने हुल दिल्यामुळे सर्वच जण पेचात पडले आहेत. उन्हाळयाने त्रस्त झालेल्यांना पावसाळी पिकनिकला जाण्याची आस लागली आहे. प्लॅन तर करत आहोत. पण ते सध्या पेण्डिंग ठेवले आहेत. - हनिफ तडवी