शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

अवकाळी पावसाचा ५१ हजार शेतकऱ्यांना २१ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 01:37 IST

३१,५७७ हेक्टर पीक नष्ट : नुकसानभरपाई हेक्टरी अवघी ६८०० रु.

सुरेश लोखंडे 

ठाणे : अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ५१ हजार ५१ शेतकऱ्यांच्या ३१ हजार ५७७ हेक्टरवरील खरीप हंगामाचे पीक नष्ट झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी सुमारे सहा हजार ८०० रुपये नुकसानभरपाई देण्याच्या हालचाली सुरू आहे. यानुसार जिल्ह्यातील शेतकºयांना अंदाजे २१ कोटी ४१ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यासाठी आतापर्यंत १६ हजार ७२८ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

अवकाळी पावसाने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून देण्यात येणारी नुकसानभरपाई अत्यल्प असल्याने शेतकºयांत युती सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आहे. मात्र, ही नुकसानभरपाई दुप्पट देण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.लोकमतने अवकाळी पावसाने शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीवर प्रकाशझोत टाकल्यानंतर रविवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तर मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शहापूर-मुरबाड तालुक्यात शेतांत जाऊन शेतकºयांना दिलासा देऊन तत्कान पंचनामे करण्याचे आदेश संबधित अधिकाºयांना दिले आहेत.५२२.४५ हेक्टरवरील पिकांना विमासंरक्षणजिल्ह्यातील ठाणे, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी आदी सहा तालुक्यांमध्ये यंदा ६१ हजार ९२ हेक्टरवर खरीप हंगाम घेण्यात आला. यापैकी अवकाळी पावसामुळे तब्बल ३१ हजार ५७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.या ५१ हजार शेतकºयांच्या शेतांमधील पिकांचे नुकसान झाल्यामुळे ते सध्या हवालदिल झाले आहेत. यात नऊ हजार ५६९.२२ हेक्टरवरील काढणी झालेल्या १६ हजार ८७७ शेतकºयांच्या पिकांचा समावेश आहे. या शेतकºयांनी काढणी केल्यानंतर अवकाळी पावसात पीक भिजल्यामुळे नुकसान झाले आहे.शेतात उभे असलेल्या सात हजार १५९.३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचा ११ हजार ३६४ शेतकºयांना फटका बसला आहे. यापैकी सोमवारपर्यंत २८ हजार २३६ शेतकºयांच्या १६ हजार ७२८.५४ हेक्टर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ५२२.४५ हेक्टरवरील नुकसानग्रस्त पिकांना विम्याचे संरक्षण असल्याचे उघडकीस आले आहे.१४ हजार ८४९ हेक्टरक्षेत्राचे पंचनामे शिल्लकपीकविम्याचे संरक्षण असलेल्यांमध्ये दोन हजार ८६० शेतकºयांचा समावेश आतापर्यंतच्या पंचनाम्यांवरून निदर्शनात आले आहेत. पंचनामे झाल्यानंतर पीकविम्याचे संरक्षण असलेल्या शेतकºयांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. अजूनपर्यंत शिल्लक राहिलेल्या १४ हजार ८४९ हेक्टरवरील पीकनुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनाम्यानंतर विमासंरक्षण असल्याचे उघड झालेल्यांमध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील दोन हजार ४५० शेतकºयांचा समावेश आहे. त्यांच्या ४३१ हेक्टरवरील पिकाला विम्याचेदेखील संरक्षण आहे. या मुरबाड तालुक्यात नऊ हजार १४९ शेतकºयांच्या सहा हजार ७०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज निश्चित केला आहे. यापैकी आतापर्यंत सहा हजार ३८४ शेतकºयांच्या चार हजार ३८७ हेक्टरवरील पीकनुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये एक हजार ९७४ हेक्टरवरील कापणी झालेल्या दोन हजार ८७३ शेतकºयांचा तर दोन हजार ४१३ हेक्टरवरील उभे पिक असलेल्या तीन हजार ५११ शेतकºयांचा समावेश आहे. 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस