शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

हिंदी मराठी गीतांच्या मैफीलीत कट्टेकरींनी अनुभवला शब्द सुरांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 16:56 IST

ठाणे : बाहेर श्रावणातील सरी कोसळत असताना अत्रे कट्ट्यावर मात्र प्रेक्षकांनी शब्द सुरांचा पाऊस अनुभवला. हिंदी मराठी गीतांच्या मैफीलीत ...

ठळक मुद्दे हिंदी मराठी गीतांची मैफीलप्रेक्षकांनी अनुभवला शब्द सुरांचा पाऊस ७६ वर्षीय प्रतिभा कुलकर्णी यांनी जिंकली मने

ठाणे : बाहेर श्रावणातील सरी कोसळत असताना अत्रे कट्ट्यावर मात्र प्रेक्षकांनी शब्द सुरांचा पाऊस अनुभवला. हिंदी मराठी गीतांच्या मैफीलीत ठाणेकर रसिक न्हाऊन निघाले. ‘हृदयी वसंत फुलताना....’, ‘अश्वीनी ये ना...’ या गाण्यांवर रसिकांनी ठेका धरला. ७६ वर्षीय प्रतिभा कुलकर्णी यांनी आपल्या सुरेल आवाजात रसिकांची मने जिंकली. आचार्य अत्रे कट्ट्यावर बुधवारी स्वरांगिनी प्रस्तुत ही मैफील आयोजित केली होती.

    ज्योती राणे यांनी ‘सारेगमप’ या गाण्याने सुरूवात केली. सुरेश चव्हाण यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘रिम झीम गिरे सावन’, प्रतिभा कुलकर्णी यांनी ‘बोल रे पपीहरा’, ‘ज्योती कलश झलके’, ‘ओ बसंती पवन’, संदीप वराडकर ‘प्रीतीच्या चांदराती’, ‘जिंदगी कैसी है पहेली’, ज्योती राणे यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’, विद्या सकपाळ यांनी ‘लाजरा हसरा श्रावण आला’, ‘रुपेरी वाळूत’ ही गीते सादर केली. द्वंद्व गीतांनी तर कट्ट्यावर धम्माल उडवली. रामकृष्ण राऊळ व विद्या सकपाळ यांनी ‘प्यार हुआ इकरार हुआ’ व ‘याद किया दिल ने कहाँ’, ज्योती राणे व विद्या सकपाळ यांनी ‘आला आला वारा’, संदीप वराडकर व प्रतिभा कुलकर्णी यांनी ‘संधीकाली’, सिद्धार्थ मोहीते व प्रतिभा कुलकर्णी यांनी ‘कुहु बोले रे पपी’ ही गीते सादर केली. जुन्या गीतांंत तर रसिक दंग झाले होते. सिद्धार्थ मोहिते यांनी किबोर्ड, हामोर्नियम मनोहर पवार तर प्रमोद कदम यांनी बाजू सांभाळली. वैशाली केकान यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.  कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांची उपस्थिती होती. ७६ वर्षीय प्रतिभा कुलकर्णी यांनी या वयातही आपली गाण्याची आवड जोपासत असल्याने कट्टेकऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. श्रावणातल्या सरी आणि शब्द सुरांचा पाऊस याचा मिलाप कट्ट्यावर जुळून आला होता. कट्ट्यावर बहुसंख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थइत होते. जुन्या काळातील गाणी सादर होताच गायकांबरोबर ते ही जागी बसून गुणगुणत होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक