शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
6
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
7
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
8
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
9
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
10
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
11
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
12
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
13
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
14
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
15
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
16
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
17
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
18
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
19
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
20
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!

पालघरमध्ये पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:55 IST

वाहतूककोंडीसह जनजीवन विस्कळीत : वसई-विरारमध्ये सखल भागात साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : मंगळवार रात्रीपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यात अनेक भागांत चांगलाच धुमाकूळ घातला. रात्रभर सुरू असलेला पाऊस बुधवारी दिवसभरही कोसळतच होता. या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. तसेच सखल भाग पाण्याखाली गेलेले दिसले. धरण क्षेत्रांतही चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटण्यास बऱ्यापैकी मदत झाली असली, तरी ग्रामीण भागात मात्र शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.नालासोपारा शहरात पाणी साचल्याने सखल भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मंगळवारी सायंकाळपासून ते बुधवारी सकाळी या दिवसभरात मांडवीत ३० मिलिमीटर, आगाशी १३७ मिलिमीटर, निर्मळ १५६ मिलिमीटर, विरार ६६ मिलिमीटर, माणिकपूर १५१ मिलिमीटर, तर वसईत सर्वात जास्त १८२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत २६३९ मिलिमीटर पाऊस वसई तालुक्यात पडला आहे.रात्री ८ वाजल्यापासून कोसळणाºया पावसामुळे नालासोपारा शहराच्या पूर्वेकडील तुळिंज, सेंट्रल पार्क , विजय नगर, ओस्तवाल नगर, अलकापुरी, गाला नगर, टाकी रोड, प्रगती नगर, महेश पार्क या ठिकाणी पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर संतोष भवन, बिलालपाडा, धनिवबाग, श्रीराम नगर या विभागातील सखल भागातही पाणी साचले होते. काही रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहने बंद पडून वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यावर शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आली.मंगळवारपासून सुरू झालेला जोरदार पाऊस बुधवारीही कोसळतच होता. तालुक्यात १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रांतदेखील समाधानकारक पाऊस झाल्याने वसईकरांची पाण्याची चिंता मिटण्यास मदत होणार आहे. रात्रीच्या सुमारास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे नालासोपारा, राष्ट्रीय महामार्ग, वसई पश्चिम व पूर्व भागात तसेच विरार परिसरातील सखल भागात पाणी साचले होते. परिणामी नागरी जीवन विस्कळीत झाले.अर्नाळ्यामध्ये घरांचे नुकसानच्विरार पश्चिमेतील अर्नाळा येथे परतीच्या पावसाबरोबरच आलेल्या चक्रीवादळामुळे येथील स्थानिक रहिवासी आनंद बरबोज यांच्या म्हशींच्या तबेल्याचे नुकसान झाले आहे.च्तबेल्यावरील १०० ते १२५ पत्रे पूर्णपणे तुटून खाली रस्त्यावर पडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.च् तसेच अर्नाळा येथील काही घरांचेही नुकसान झाले असून भिंतीला भेगा पडल्या आहेत. मोठी झाडे घरावर पडली आहेत.