ड्रग प्रकरणी ठाणे जिल्ह्यात छापे; गुंतलेल्यांची माहिती स्थानिक पाेलिसांना - शंभूराज देसाई
By सुरेश लोखंडे | Published: December 9, 2023 07:21 PM2023-12-09T19:21:17+5:302023-12-09T19:21:30+5:30
जीव घेण्या ड्रगच्या व्यवसायात गुंतलेल्या काही जणांवर जिल्ह्यात ठिकठिकाणी धाड टाकून एनआयएने काही जणांवर कारवाई केली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ड्रग प्रकरणी ठाणे जिल्ह्यात एनआयएकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणी पाेलिस अधीक्षक यांच्याशी बाेलणे झाले असून त्यांच्याकडून प्राथमिक माहितीचे इनपूट मिळाले आहे. जे लाेक ड्रगचा व्यवसाय करीत हाेते. त्यांची माहिती स्थानिक पाेलिसांसह एनआयएला हाेती. त्यानुसार आज जिल्ह्यातही हे धाडसत्र सुरू झाले आहे. एनआयए स्थानिक पाेलिसांच्या मदतीने कारवाई करीत आहे. जे काेणी असे गैरकृत्य करीत असतील त्यावर आमचे पाेलीसही नजर ठेवून आहे. अजूनही जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई सुरूच असल्यचे उत्पादन शुल्क राज्यमंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाण्यात पत्रकारांशी बाेलताना स्पष्ट केले.
जीव घेण्या ड्रगच्या व्यवसायात गुंतलेल्या काही जणांवर जिल्ह्यात ठिकठिकाणी धाड टाकून एनआयएने काही जणांवर कारवाई केली आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा गावाजवळील बाेरीवली येथेही धाड टाकण्यात आली. यास अनुसरून पत्रकारांनी देसाई यांना बाेलते केले असता ते बाेलत हाेते. भिवंडीच्या काल्हेर येथील कार्यक्रमानंतर ते ठाणे येथील शासकीय विश्रामगृहावर आले असता त्यांना पत्रकारांनी जिल्ह्यातील एनआयएच्या धाडसत्राविषयी बालते केले. एनआयएने तपास सुरू केलेला आहे,छापे घातलेले आहेत. त्यास अनुसरून प्राथमिक माहिती मला मिळाली असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात ड्रगचा व्यवसाय काही लाेक करीत हाेते. त्याची माहिती आधीच पाेलिसांना हाेती. त्यानुसार ही कारवाई झाल्याचे देसाई यांनी सांगितले. ड्रग व्यवसायातील लाेकांचे ट्रॅक रेकाॅर्ड तपासले जाईल. हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील काम आहे. परंतु त्यांच्या ज्या काही ॲक्टीव्हीटीज आहेत. त्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. त्याची सगळी माहिती संकलीत करून रिपिटेडली, त्यासत्यास गुन्ह्यामध्ये ज्या काेणी संघटना सहभागी असतील ती राज्यभरातील एकत्रित माहिती संकलीत करून त्यावर गृहमंत्रालय उचित निर्णय घेणार असल्याचे सुताेवाच देसाई यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बाेलताना स्पष्ट केले.