शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव, स्थानिक नगरसेवकांना डावलल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:40 IST

विरोधी पक्षांच्या स्थानिक नगरसेवकांना डावलून कच-याचे डबेवाटपाचा खुद्द महापौर डिम्पल मेहता यांनीच घातलेला घाट काँग्रेस नगरसेवकांच्या विरोधानंतर गुंडाळण्यात आला.

मीरा रोड - विरोधी पक्षांच्या स्थानिक नगरसेवकांना डावलून कचºयाचे डबेवाटपाचा खुद्द महापौर डिम्पल मेहता यांनीच घातलेला घाट काँग्रेस नगरसेवकांच्या विरोधानंतर गुंडाळण्यात आला. काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांना त्यांच्याच प्रभागात डावलण्याची राजकीय खेळी सत्ताधारी भाजपाकडून चालवल्याने कचºयाच्या डब्यांच्या वाटपावरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.ओला व सुका कच-याचे वर्गीकरण कायद्याने बंधनकारक असताना आजही शहरात त्याचे काटेकोर पालन केले जात नाही. लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाकडून याबाबत सातत्य व सक्तीची कारवाई केली जात नसल्याने नागरिकांनीही कचरा वर्गीकरण गांभीर्याने घेतलेले नाही. शहरातील कचरा वर्गीकरण बारगळले असताना दुसरीकडे मतदारांना खूश करण्यासाठी त्यांना ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी विनामूल्य कच-याचे डबे देण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक, ही डबेखरेदीही नागरिकांच्या करांद्वारे मिळालेल्या पैशांतूनच केली जाणार आहे.डबेवाटपाचा महापौर, उपमहापौर, आयुक्त, विरोधी पक्षनेते, प्रभाग समिती सभापती आदी पदाधिकाºयांच्या हस्ते प्रातिनिधिक डबेवाटपाचा कार्यक्रम उरकून नंतर स्थानिक नगरसेवकांमार्फत प्रभागातील इमारती आदींना डबे देणे अपेक्षित होते. असे असताना काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मात्र त्यांना डावलून थेट महापौर मेहता यांच्या हस्ते कचºयाचे डबे वाटण्याचा प्रयत्न मीरा रोडमध्ये गुरुवारी झाला.येथील प्रभाग क्र. १९ मध्ये काँग्रेसचे अनिल सावंत, मर्लिन डिसा, रूबिना शेख व राजीव मेहरा असे चार नगरसेवक आहेत. शीतलनगर, साईबाबानगर, गोविंदनगर, नयानगर आदी परिसर या प्रभागात येतो. प्रभागातील इमारतींना कचºयाचे डबे वाटण्यासाठी आधी महापौरांच्या हस्ते कार्यक्रम करण्याचे सांगण्यात आले. त्याला स्थानिक नगरसेवकांनी सहमती दर्शवली. पण, गुरुवारी सकाळी मात्र सावंत यांना कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी कळवले. सावंत यांनी आयुक्तांना ही बाब सांगितली असता बालाजी खतगावकर यांनी तुम्ही डबेवाटपाचा कार्यक्रम करून घ्या, असे स्पष्ट केले.उडाली शाब्दिक चकमकमहापौर मेहतांच्या हस्ते डबेवाटपाचा कार्यक्रम सुरू झाल्याचे कळताच सावंत तेथे पोहोचले. स्थानिक नगरसेवकांना डावल्याने चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. तर, महापौरांनीही आपण प्रभाग अधिकाºयास नगरसेवकांना कळवा, असे सांगितल्याचे स्पष्ट केले. महापौर गेल्यावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी डबे वाटले.प्रभाग अधिकारी बोरसे यांनी आधी कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगितले. मात्र, दुसरीकडे महापौरांच्या हस्ते डबेवाटप सुरू केले. स्थानिक नगरसेवकांना मुद्दाम डावलण्याचा प्रकार महापौर, सत्ताधारी भाजपा व त्यांच्या तालावर प्रशासन करत आहे. - अनिल सावंत, नगरसेवक, काँग्रेसकार्यक्रम रद्द झाल्याचे आपण सांगितलेच नसून नगरसेवक खोटे बोलत आहेत. कार्यक्रमाची माहिती आदल्या दिवशीच दिली होती. महापौरांनी येणार असल्याचे सांगितल्याने त्यांच्या हस्ते डबेवाटप केले. - चंद्रकांत बोरसे, प्रभाग अधिकारी

टॅग्स :thaneठाणे