शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

राजकीय हस्तक्षेपामुळे वाहतुकीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:30 IST

पोलीस नियम का पाळत नाहीत. कोपरीत बसविरोधी आंदोलन करूनही वाहतूककोंडी आजही जाणवते. कंपनीच्या नावाखाली अवैध वाहतूक करणाºया बसेसवर कारवाई

ठाणे : पोलीस नियम का पाळत नाहीत. कोपरीत बसविरोधी आंदोलन करूनही वाहतूककोंडी आजही जाणवते. कंपनीच्या नावाखाली अवैध वाहतूक करणाºया बसेसवर कारवाई का होत नाही. नो-पार्किंगचा बोर्ड नसूनही त्या ठिकाणी वाहन पार्क केल्यावर त्या वाहनांवर वाहतूक विभाग कारवाई कशी काय करू शकतो, अशा शेकडो प्रश्नांची सरबत्ती वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे यांच्यावर शनिवारी ठाणेकरांनी केली.मुंबईत पोलीस कारवाई करतात, तेव्हा त्यांच्या कारवाईत कोणाचाही हस्तक्षेप नसतो. माझ्या विभागातील अधिकारी-कर्मचाºयांना कारवाई करताना कोणाचाही फोन घेऊ नका, अगदी माझा असेल तरी घेऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत, असे सांगत ठाण्यातील राजकीय हस्तक्षेपावर वाहतुकीच्या बेशिस्तीचे खापर फोडले.‘समन्वय प्रतिष्ठान’तर्फे शनिवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे ‘ठाणे वाहतूककोंडी समस्या व उपाय...’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले होते. या वेळी ठाणेकरांनी प्रश्नांचा पाऊस पाडला. या पदाचा कार्यभार स्वीकारून आपल्याला जेमतेम चार दिवस झाले आहेत, असे सांगत काळे यांनी आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र, आपल्या कार्यकाळात ‘वाहतूककोंडीमुक्त ठाणे’ करण्याचे आश्वासन काळे यांनी दिले.कोपरी येथे ठाणेकरवाडीपर्यंत रस्त्यांवर, फुटपाथवर वाहने उभी राहतात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असे विलास निकम यांनी विचारले. नो-पार्किंगमध्ये सर्व वाहने उभी असतात, नो-एण्ट्रीमधून सर्रास गाड्या जातात, हा मुद्दा बाळकृष्ण पणीकर यांनी मांडला. कोपरीत येणाºया कंपनीच्या बसेसमधून अवैध वाहतूक चालते. त्यांची तपासणी करा, अशी मागणी राजेश गाडे यांनी केली. कोपरी ब्रिजवर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत प्रचंड वाहतूक असते. याकडे हेमंत पाटील यांनी लक्ष वेधले. ज्ञानेश पाटील यांनी पार्किंगसाठी २७ भूखंड फक्त कागदावर आहेत असे ताशेरे ओढले.उपायुक्त काळे म्हणाले की, मुंबईत वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा जसा धाक आहे, तसा ठाण्यातील वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा नसल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणेकर मुंबईत गेल्यावर नियम पाळतात, पण ठाण्यात पाळत नाही. मुंबईत पोलीस कारवाई करतात, तेव्हा त्यांच्या कारवाईत कोणाचाही हस्तक्षेप नसतो. जी भीती टोलनाक्यापलीकडे आहे, ती अलीकडे नाही, असे स्पष्टपणे सांगताना त्यांनी वाहतूक विभागाकडून ई-चॅनल सिस्टीम सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच, कारवाईमध्ये वाहनचालकाकडून परवाना जप्त केल्यास त्याची माहिती सर्व आरटीओ कार्यालयात दिली जाईल, जेणेकरून परवाना हरवल्याची खोटी माहिती देऊन दुसरा वाहन परवाना तो वाहनचालक घेऊ शकणार नाही. समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविक केले. (संबंधित वृत्त पान ३)नागरिकांच्या ज्वलंत विषयावरील समस्या ऐकण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गैरहजर राहिल्याने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. महापालिकेच्या वतीने किमान एक अधिकारी उपस्थित राहू शकत नाही का, असा सवाल उपस्थित केला.वाहतूक विभागाचे अधिकारी वेळेत न आल्याने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. अधिकारी वाहतूककोंडीत अडकल्याने येण्यास थोडा उशीर होईल, असे व्यासपीठावरून सांगितल्यानंतर आम्ही पण वाहतूककोंडीतून आलो आहोत. त्यांना जास्त उशीर झाला, तर बाहेरच थांबवा, अशा शब्दांत कळवास्थित मधुकर झेमसे यांनी आपला रोष व्यक्त केला. काही ज्येष्ठ नागरिकांचा संताप इतका अनावर झाला होता की, ते सारखे तावातावाने बोलत व्यासपीठाकडे धाव घेत होते.