शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

उल्हासनगरात तब्बल ५० हजार कुटूंब गॅस सिलेंडर विना, पंतप्रधानाच्या गॅस जोडणी योजनेवर प्रश्नचिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 19:47 IST

शहरातील १ लाख ३१ हजार शिधापत्रिकाधारका पैकी तब्बल ५० हजार कुटूंब गॅस सिलेंडर विना आहेत. रॉकेल, लाकुड, लागडाचा लगदा व गोव-यावर स्वयंपाक केला जात असून याबाबत

सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील १ लाख ३१ हजार शिधापत्रिकाधारका पैकी तब्बल ५० हजार कुटूंब गॅस सिलेंडर विना आहेत. रॉकेल, लाकुड, लागडाचा लगदा व गोव-यावर स्वयंपाक केला जात असून याबाबत असंख्य तक्रारी शिवसेनेच्या अपंग सेलकडे आल्याची माहिती भरत खरे यांनी दिली.उल्हासनगरात पुर्वे व पश्चिम असे दोन शिधावाटप कार्यालय आहेत. दोन्ही कार्यालयात एकून १ लाख ३१ हजार शिधावाटप कार्डधारकांची संख्या असून त्यापैकी ५० हजार कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर जोडणी नाही. त्यांना स्वयंपाकासाठी आजही रॉकेल, लाकडे, लाकडाचा लगदा व गोव-याचा वापर करावा लागत आहे. पंतप्रधान मोदी सरकारची मोफत गॅस सिलेंडर जोडणी गेली कुठे?. असा प्रश्न शिवसेनेच्या अपंग सेलचे भरत खरे यांनी शासनाला केला. तर स्वस्त दराचे रॉकेल लाटण्यासाठी, कार्डधारकांची फुगीर संख्या दाखविल्याचा आरोप सर्वस्तरातून होत आहे.

शहरातील शिधावाटप अधिकारी शंकर होणमाने व जगन्नाथ सानप यांनी शहरातील एकून कार्डधारका पैकी ४० टक्के कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर नसल्याची माहिती दिली. तसेच शासनाच्या अन्न सुरक्षा योजने अंतर्गत ९२ हजार कार्डधारक येत असून त्यांचे उत्पन्न ६९ हजाराच्या कमी आहे. गहु २ रूपये किलो तर तांदुळ ३ रूपये दराने त्यांना शिधावाटप दुकाना मार्फत दिले जाते. शिधावाटप पुर्वे कार्यालयात एकून ५६ हजार कार्डधारक पैकी तब्बल २१ हजार कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर नाही. तर शहर पश्चिमेतील शिधावाटप कार्यालयात ७५ हजार कार्डधारक असून त्यापैकी ३१ हजार कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर जोडणी नसल्याचे उघड झाले. स्वस्त दराचे रॉकेल लाटण्यासाठी गॅस जोडणी नसलेल्या कार्डधारकांची संख्या जास्त दाखविल्याची टिका होत आहे.निरिक्षकाकडून चुकीचे सर्वेक्षणशहरातील तब्बल ४० टक्के कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर जोडणी नसल्याचे दाखविले. रॉकेल लाटण्यासाठी असी संख्या दाखविल्याचा आरोप होत असून शिधावाटप निरिक्षकांनी चुकीचे सर्वेक्षण केल्याचा आरोप होत आहे.

गरीबांच्या तोंडाचा घास पळविलाशिवसेना अपंग सेलचे भरत खरे यांनी शिधावाटप निरिक्षकांनी चुकीचे सर्वेक्षण केल्याने, शेकडो नागरिक स्वस्त धान्या पासून वंचित झाल्याचे सांगितले. गरजु नागरिकांच्या समस्या शिधावाटप अधिकां-यानी सोडल्या नाहीतर, शिवसेनेच्या स्टाईलने आंदोंलन करण्याचा इशारा निवेदनाद्बारे देण्यात आला.