शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण बाजूला ठेवून काेराेनाकाळात एकत्र या; कपिल पाटील यांची सवाद काेविड सेंटरला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 23:16 IST

कपिल पाटील यांची सवाद काेविड सेंटरला भेट

भिवंडी : कोरोना संकटकाळात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन सध्याच्या आणीबाणीला सामोरे जायला हवे, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले आहे. सवाद जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजनपुरवठा करून ते पूर्ण क्षमतेने सुरू करावे, असे आवाहनही खासदारांनी जिल्हा प्रशासनाला रविवारी केले.

भिवंडी तालुक्यातील सवाद येथील केंद्रासंदर्भात रुग्ण व नातेवाइकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी रविवारी सवाद केंद्राला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती गुरुनाथ गायकर, उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर, राम माळी, श्रीकांत गायकर, दत्तात्रय पाटोळे, यशवंत सोरे, भाजयुमोचे जिल्हा कार्याध्यक्ष जगन पाटील, डॉ. राहुल घुले आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. मात्र, सवाद येथील केंद्रात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा नसल्यामुळे रुग्णांना दाखल करता येत नाही. त्यामुळे पुरेसा ऑक्सिजन साठा करून सर्वच्या सर्व ८८० बेडवर रुग्णांना दाखल करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.  जिल्ह्यातील खेड्यातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच उपाययोजनांमध्ये आरोग्य यंत्रणा तोकडी पडली आहे. या काळात राजकारण करणे योग्य नाही. त्याऐवजी सर्वांनी एकत्रित या आणीबाणीला सामोरे जावे लागले.

ऑक्सिजन प्लांटची  केली पाहणी

केंद्र सरकारने ऑक्सिजन साठ्याबरोबरच रेमडेसिविर इंजेक्शनचा वाढीव कोटा दिला आहे. राज्य सरकारही कोरोनासाठी उपाययोजना करीत आहे. नागरिकांनीही सरकारच्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन पाटील यांनी केले. सवाद रुग्णालयात २४ टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. या प्लांटचीही खासदारांनी पाहणी केली. त्यावेळी १ मेपर्यंत प्लांट सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस