शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

CoronaVirus News in Thane: वैद्यकीय साहित्य खरेदीत घोळ, मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीटची चढ्या भावाने खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 01:56 IST

कोरोना येण्यापूर्वीच महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी मास्क, पीपीई कीट, सॅनिटायझर तसेच इतर साहित्याची अवास्तव दरात खरेदी केल्याची गंभीर माहिती उघड झाली आहे.

अजित मांडके ठाणे : एकीकडे ठाण्यावर कोरोनाचे संकट गडद होत असताना, दुसरीकडे याच काळात महापालिकेत आणखी एक घोळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना येण्यापूर्वीच महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी मास्क, पीपीई कीट, सॅनिटायझर तसेच इतर साहित्याची अवास्तव दरात खरेदी केल्याची गंभीर माहिती उघड झाली आहे.वास्तविक , कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर या वस्तुंचे दर कमी झाल्याने आधीच या वस्तुंची खरेदी का केली, असा सवाल उपस्थित होत आहे. यापुढे अशा प्रकारचे प्रस्ताव परस्पर मंजुर करुनये, तसेच प्रशासकीय मान्यतेशिवाय कामे करु नये, असे परिपत्रक आयुक्तांनी यापार्श्वभूमीवर काढले आहे.ठाणे महापालिकेत निविदा प्रक्रिया न राबवता कामे करुन घेण्याचे अनेक प्रकार या आधीही घडले आहेत. आधी हव्या त्या दरात काम करुन घ्यायचे, त्यानंतर प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करायचा, असा काहीसा प्रकार महापालिकेत मागील कित्येक वर्षांपासून सुरु आहे. कोरोनाच्या संकटकाळातही असाच काहीसा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध वैद्यकीय साहित्य घेणे क्रमप्राप्त आहे. एखादी आपत्ती आल्यास अत्यावश्यक बाब म्हणून अशा प्रकारची साहित्य खरेदी करता येऊ शकते. मात्र अशी परिस्थिती ठाण्यात निर्माण होण्याआधीच या साहित्याची अवाजवी दरात खरेदी केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कोरोनाची साथ येण्यापूर्वीच महापालिकेत काही अधिकाऱ्यांनी सॅनिटायझर, मास्क, पीपीई कीट, क्वारन्टाइन केंद्रामधील साहित्य आदींची खरेदी अवास्तव दराने केली होती. याच कालावधीत आयुक्त विजय सिघंल यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांच्यासमोर जादा दराने खरेदी केलेल्या साहित्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आला होता. हे साहित्य कधी खरेदी केले गेले, याची मला माहिती नसल्याने त्यावर सही कशी करु ,असा सवाल करुन आयुक्तांनी संबंधित अधिकाºयांना धारेवर धरल्याचे सूत्रांनी सांगितले.>विभागप्रमुखांवर कारवाईचा इशाराकोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास नेमकी सुरुवातच झाली होती, त्या काळात बहुतांश वैद्यकीय साहित्याचे दर जवळजवळ अर्ध्यावर आले होते. असे असताना या साहित्याची खरेदी प्रादुर्भावास सुरुवात होण्यापूर्वीच का केली गेली, असा आक्षेप ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी नोंदवला आहे. एखादी आपत्ती आली असेल तर तातडीची बाब म्हणून असे प्रस्ताव मंजुर केले जातात. परंतु तशी मंजुरीही न घेतल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक होत आहे. ही परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून आयुक्तांनी वैद्यकीय साहित्य खरेदीच्या या या प्रस्तावावर सही केली. परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात असा प्रकार आढळल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे दिला आहे.>कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यात असताना पालिकेने वैद्यकीय साहित्य खरेदी केले. याच कालावधीत आयुक्त म्हणून विजय सिंघल यांची नियुक्ती झाली आणि हा गंभीर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या