शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काल्हेर गावातील १.८६ कोटींच्या दरोड्यातील आरोपी पंजाब, तामिळनाडूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:20 IST

सहा जणांच्या टोळीपैकी चौघांनी त्यांच्या कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला होता.

ठाणे : भिवंडीतील काल्हेर गावातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे दरोडा टाकून एक कोटी ८६ लाख ३० हजारांचे दागिने लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीतील धर्मेश रणछोड वैष्णव (३८, रा. ऐरोली, नवी मुंबई) याला सर्व सोन्याच्या दागिन्यांसह ऐरोलीतून अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्याचे पाच साथीदार, पंजाब आणि तामिळनाडूत फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी दोन पथके नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

काल्हेर येथील व्यावसायिक जगदीश पाटील हे ३० जानेवारी रोजी मॉर्निंग वॉकसाठी पडले असता, सहा जणांच्या टोळीपैकी चौघांनी त्यांच्या कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला होता. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दरोड्यासह आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल झाला होता. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली आणि मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या नेतृत्वाखाली आठ पथकांकडून या दरोड्याचा तपास करण्यात येत होता.

तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे यामध्ये धर्मेश वैष्णव या दरोडेखोराचे नाव समोर आले. सलग तीन दिवस आणि तीन रात्र मेहनत घेऊन धर्मेशला एका बॅगेसह होनराव यांच्या पथकाने नवी मुंबईतून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील सर्वच्या सर्व म्हणजे चार किलो २१ ग्रॅम वजनाचे एक कोटी २६ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. त्याला दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या आणखी पाच साथीदारांपैकी तिघे पंजाबमध्ये तर दोघे चेन्नईमध्ये पसार झाले असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. पलायन केलेल्या आरोपींनी दरोड्यातील रोकड नेल्याचेही धर्मेशने चौकशीत पोलिसांना सांगितले.

मध्यप्रदेशातील राजगडमध्येही दरोडा

धर्मेश हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने मध्यप्रदेशातील राजगड येथे २०१५ मध्ये दरोडा टाकला होता. या दरोड्यामध्येही त्याने सराफाच्या दुकानातील सोन्याचे दागिने लुटले होते. याच गुन्ह्णामध्ये त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्याने भिवंडीतील काल्हेरमध्ये काही साथीदारांच्या मदतीने पुन्हा दरोडा टाकल्याचे समोर आले आहे.

तपास पथकांना ५० हजारांचे बक्षीस

पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली आणि अनिल होनराव या दोघांच्या पथकांनी अत्यंत मेहनतीने या दरोड्याचा मोठ्या कौशल्याने तपास केल्याचे सांगत दोन्ही पथकांसाठी प्रत्येकी २५ हजारांचे असे ५० हजारांचे बक्षिस पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या वेळी जाहीर केले.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र