शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध्य मद्यविक्री करणाऱ्या ३४ आरोपींवर दंडात्मक कारवाई; ८ लाख १० हजारांचा दंड वसुल

By अजित मांडके | Updated: December 11, 2023 15:24 IST

राष्ट्रीय लोक न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची ही तिसरी वेळ आहे. यावेळी लोक न्यायालयाने दोषसिद्धी निकालात गुन्हेगाराला प्रत्येकी साधारण २५ हजाराचा दंड ठोठावला आहे.

ठाणे : दुसऱ्या राज्यातील मद्य विक्रीस मज्जाव करण्यासाठी तसेच अवैध्य मद्यविक्री करण्यांना अद्दल घडावी या उद्देशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे कार्यालयामार्फत अशांच्या विरोधात लोक न्यायालयात गुन्हे दाखल केले होते. यामधील ३३ गुन्ह्याचा नुकताच दोषसिध्दीचे (कन्वेक्शन) निकाल दिल्यानंतर ३४ आरोपींवर दंडात्मक कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून आठ लाख १० हजारांचा दंड वसूल केला आहे.

ठाणे जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभाग भरीव कामगिरी करत असताना, विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात गुन्हे दाखल केले होते. यामध्ये ३३ गुन्ह्यात  न्यायालयाने दोषसिध्दी (कन्वेक्शन) निकाल देत ३४ आरोपींना दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.

राष्ट्रीय लोक न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची ही तिसरी वेळ आहे. यावेळी लोक न्यायालयाने दोषसिद्धी निकालात गुन्हेगाराला प्रत्येकी साधारण २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. जमा झालेल्या दंडाची रक्कम आठ लाख १० हजार  असून, दोष सिद्धी उपक्रमातून जास्तीत जास्त गुन्हे निकाली काढण्याचा प्रयत्न उत्पादन शुल्क विभागाचा आहे. महाराष्ट्रात दारूबंदी कायदा १९४९ कलम ६५ ई  अंतर्गत लोक न्यायालयात गुन्हे दाखल केले जात आहेत. यामुळे आरोपींना चांगलीच जरब बसत असून, शासनाच्या महसुलात वाढेल. अवैध मद्यविक्री, निर्मित, वाहतुकीला आळा बसण्यास मदत मिळणार आहे. डॉ. निलेश सांगडे (जिल्हा अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग ठाणे)

टॅग्स :thaneठाणे