शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कर भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची ‘शिक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:41 IST

मालमत्ता कर, पाणीबील भरण्यासाठी नागरिक केडीएमसीच्या कार्यालयांमध्ये येत आहेत

डोंबिवली : अनलॉक १ मध्ये सरकारी कार्यालये नागरिकांच्या कामासाठी खुली झाली असली तरी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कर भरण्यासाठी त्यांना तासन्तास रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत आहे. त्यात होणाºया गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचेही तीनतेरा वाजल्याचे चित्र केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात पाहायला मिळत आहे.

मालमत्ता कर, पाणीबील भरण्यासाठी नागरिक केडीएमसीच्या कार्यालयांमध्ये येत आहेत. परंतु, कार्यालयांमध्ये अद्यापही पुरेसे कर्मचारी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरी सुविधा केंद्रांत मालमत्ता कर, पाणीबील स्वीकारणे तसेच जन्म-मृत्यू नोंदणीचे दाखले दिले जातात. ही सुविधा आॅनलाइनद्वारेही उपलब्ध आहे. परंतु, सर्व्हर वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना कर भरण्यासाठी कार्यालयांमध्ये जावे लागत आहे.केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रातील बरेचसे कर्मचारी कोविड १९ अंतर्गत वैद्यकीय विभागात कामासाठी घेतले आहेत. त्यामुळे तेथील धुरा केवळ दोन कर्मचाऱ्यांवर आहे. कर भरण्यासाठी येणाºया नागरिकांची संख्या वाढत असताना कर्मचाºयांच्या अभावामुळे त्यांना तासन्तास उभे राहावे लागत आहे. तसेच गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. कामाला विलंब होत असल्याने नागरिकांना दोन ते तीन दिवस कार्यालयात वारंवार यावे लागते. शनिवार व रविवारी हे केंद्र बंद असते. त्यामुळे सोमवारी गर्दी होते. कराचे वार्षिक उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्याप्रमाणे आर्थिक वर्षाच्या अखेरीस शनिवार आणि रविवारही केंद्र चालू ठेवली जातात. त्याप्रमाणे ती आताही चालू ठेवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.विवाहनोंदणी बंदकेडीएमसी कार्यालयात केली जाणारी विवाहनोंदणी प्रक्रियाही लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे ठप्प झाली आहे. अजूनही ती सुरू झालेली नाही. त्यामुळे एप्रिल, मे व सध्या जूनमध्ये नवीन विवाह झालेले तसेच नोंदणी न झालेले दाम्पत्य विवाहनोंदणी कधी सुरू होईल, अशी विचारणा सातत्याने पालिकेकडे करत आहेत.

टॅग्स :dombivaliडोंबिवली