शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

उसनवारीने घेतलेल्या पाच हजारांसाठी मित्राचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 20:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : उसनवारीने घेतलेल्या अवघ्या पाच हजारांसाठी मित्राचाच खून करणाºया अनिल वाल्मिकी (२८) याला ठाणे जिल्हा ...

ठळक मुद्देठाणे न्यायालयाचा निर्णय पाच वर्षांपूर्वी झाले होते हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उसनवारीने घेतलेल्या अवघ्या पाच हजारांसाठी मित्राचाच खून करणाºया अनिल वाल्मिकी (२८) याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी बुधवारी जन्मठेपेची आणि पाच हजारांच्या दंडाची तसेच दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. खूनानंतर आरोपीने सुधीर सिंग (३३) या मित्राचा मृतदेह घरातच ठेवून बाहेरुन कुलूप लावून पलायन केले होते.वर्तकनगरमधील शास्त्रीनगर भागातील रहिवाशी सुधीर हा ३१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घराबाहेर पडला. परंतू, तो दुसºया दिवशीही घरी परतला नव्हता. त्याच्या कामाच्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्याची पत्नी राणी सिंग (३४) यांनी याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात १ आॅगस्ट २०१५ रोजी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. याच चौकशीसाठी २ आॅगस्ट रोजी पुन्हा ती पोलीस ठाण्यात गेली. त्यावेळी सुधीरचा मित्र अनिल वाल्मीकीही तिथे आला होता. वारंवार उधारीच्या पैशांची मागणी करुनही सुधीरने पाच हजार रुपये न दिल्याने त्याच्या डोक्यात सत्तूरने वार करुन त्याचा खून केल्याची कबूली त्याने त्यावेळी दिली. त्याआधी ३१ जुलै रोजी दोघांनीही मद्यप्राशन केले. त्यानंतर अनिलने सुधीरला वर्तकनगर येथील इमारत क्रमांक ४३ मधील तळमजल्यावरील शिकाऊ उमेदवारांच्या वसतीगृहामधील एका खोलीमध्ये नेले. तिथेच या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अनिलने सुधीरच्या डोक्यावर सत्तूरने वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर खोलीला बाहेरून कुलूप लावून अनिल स्वत:च्या घरी निघून गेला. अनिल यानेच दिलेल्या या माहितीनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावीत आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दुर्गधी सुटलेल्या या घरातील स्वंयपाकगृहात सुधीरचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी अनिल याला तात्काळ अटक केली. या संपूर्ण प्रकरणात दहा साक्षीदार तपासण्यात आले. सध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर, पैरवी अधिकारी पोलीस हवालदार संदीप शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल करुणा वाघमारे आदींनी न्यायालयात भक्कम पुरावे देऊन या खून प्रकरणाचा पाठपुरावा केला. तर सरकारी वकील वर्षा चंदने यांनी काम पाहिले. सर्व बाजू पडताळल्यानंतर बुधवारी याप्रकरणी आरोपी अनिल वाल्मिकी याला ठाणे न्यायालयाने १४ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयMurderखून