शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

पाकला ‘दहशतवादी राष्ट्र’ घोषित करा

By admin | Updated: April 23, 2017 04:05 IST

पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. त्यासाठी दुसऱ्या देशांची वाट बघण्याची गरज नाही, असे परखड मत एअर मार्शल भूषण गोखले यांनी

ठाणे : पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. त्यासाठी दुसऱ्या देशांची वाट बघण्याची गरज नाही, असे परखड मत एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले. तसेच, पाकिस्तानबरोबर असलेले व्यापारी व्यवहारही थांबवावे, असेही ते म्हणाले. गडकरी रंगायतन येथे सुरू असलेल्या एकोणतिसाव्या अ.भा. सावरकर साहित्य संमेलनात शनिवारी ‘भारताची संरक्षण सिद्धता’ हा परिसंवाद झाला. त्यावेळी गोखले बोलत होते. ते म्हणाले की, देशात शांतता असल्याशिवाय प्रगती होत नाही. शांततेसाठी संरक्षण सिद्धताही लागते. आपल्या देशात शांतता आणि संरक्षण सिद्धता आहे, म्हणून आपली प्रगती होत आहे. शांतता आणि संघर्ष ही आजची गोष्ट नाही, तर रामायण-महाभारतापासून चालत आले आहे. ‘संरक्षणसेना’ या शब्दापेक्षा ‘सशस्त्रसेना’ हा शब्द मला योग्य वाटतो. कारण, ‘संरक्षण’ या शब्दात कमकुवतपणा जाणवतो. कोणत्याही देशांतील युद्ध हे त्या-त्या देशांनी अटींवर थांबवले पाहिजे. राजकारणी आणि संरक्षण दलात समन्वय असला पाहिजे. संरक्षण दलाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांनी १९६५ साली झालेल्या युद्धाच्यावेळी तसे स्वातंत्र्य दिले होते. यामुळे सैन्याचे मनोबल वाढते. सैन्याचे नैतिक बळ वाढवण्यासाठी तसे नेतृत्व असले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, कारगीलच्या युद्धात वापरण्यात आलेली युद्ध साधनसामग्री ही आपल्याला आयात करावी लागली होती. त्यामुळे आपले तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आपण ‘मेक इन इंडिया’वर भर दिला पाहिजे. आपल्याकडे केमिकल, बायोलॉजिकल शस्त्रे होती, परंतु आपण ती नष्ट केली. हवाईदल, भूदल आणि नौदल यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे आणि याची प्रचीती कारगील युद्धात आली. आपत्कालीन व्यवस्थापनेत तिन्ही दल हे तत्पर सेवा देत आहेत. माध्यमांनीदेखील स्वत:च लक्ष्मणरेखा आखल्या पाहिजे. नकारात्मक बातम्या पसरवू नये. मुंबई हल्ल्यात याचा अनुभव आला होता, असेही ते म्हणाले. आपल्याला कोणत्याही देशाच्या धमकीला घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाने सैनिकासारखे सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. कमांडर सुबोध पुरोहित यांनी नौदलाची माहिती दिली. ते म्हणाले, या सेवेबद्दल फार कमी माहिती असते. आपला मुख्य व्यापार हा समुद्रमार्गाने होत असतो. नौदल हे दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध चांगले टिकवू शकते. नौदलाचे कार्यक्षेत्र फार मोठे आहे, हे सांगताना त्यांनी या सेवेच्या मुख्य शाखांची माहिती दिली. इंडोनेशिया, मलेशिया, बांग्लादेश, म्यानमार, थायलंड या पाच देशांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तानचे नौदल हे आपल्यापेक्षा छोटे आहे. सागरीमार्गाने पाकिस्तानसोबत आपली लढाई झाली, तर आपण नक्की जिंकू. चीनचे नौदल हे आपल्यापेक्षा तिप्पट आहे. चीनने आक्रमण करायचे ठरवले, तर त्यांना समुद्रमार्गाने आक्रमण करणे कठीण आहे. चीनकडून तसा धोका कमी असला, तरी गाफील राहून चालणार नाही. पाकने सागरीमार्गाने हल्ला केला, तर आपण बलाढ्य असल्याने त्यांना चोख उत्तर देऊ, असे पुरोहित म्हणाले. (प्रतिनिधी)