शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

ठाण्यात विकासाऐवजी व्यक्तींवर आधारित प्रचार

By admin | Updated: February 20, 2017 04:31 IST

आयारामांमुळेच चर्चेत आलेल्या ठाणे आणि उल्हासनगरच्या प्रचाराची रविवारी सांगता झाली ती घरोघरच्या प्रचाराच्या मोहिमा सांभाळत आणि रविवारनिमित्त

अजित मांडके, सदानंद नाईक / ठाणे, उल्हासनगरआयारामांमुळेच चर्चेत आलेल्या ठाणे आणि उल्हासनगरच्या प्रचाराची रविवारी सांगता झाली ती घरोघरच्या प्रचाराच्या मोहिमा सांभाळत आणि रविवारनिमित्त मतदारांना गाठण्यावर भर देत. ठाण्याच्या प्रचारात आयुक्त संजीव जयस्वाल हे केंद्रस्थानी राहिले, तर उल्हासनगरच्या प्रचारात वेगवेगळ्या अर्थाने चर्चा घडवली ती वादग्रस्त पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी यांनी. सर्वच पक्षांनी ठाण्यावर लक्ष केंद्रित केल्याने उल्हासनगरचा प्रचार काहीसा झाकोळला. प्रमुख नेत्यांनीही ठाण्यातच प्रचाराला सर्वाधिक पसंती दिली. ठाण्यात १२ दिवस सुरू असलेल्या प्रचारात शिवसेना विरुद्ध भाजपा आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच संघर्ष दिसून आला. परंतु, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याभोवती शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा धडाडल्या. मतदानासाठी पालिकेची तयारी पूर्ण झाली असून, मतदानाचा टक्का वाढवण्यावर दोन्ही पालिकांचे प्रयत्न सुरू आहेत.युती तुटल्याने प्रचारसभांमध्येही भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले, तर शिवसेनेने भाजपावर आगपाखड केल्याचे चित्र होते. राष्ट्रवादीनेदेखील ‘२५ वर्षे सत्तेची, २५ वर्षे नाकर्तेपणाची’ म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या चार सभा ठाण्यात होणार होत्या. परंतु, केवळ एकच सभा झाली, तीही दिव्यात. तर, काँग्रेसतर्फे फक्त नारायण राणे आणि सचिन सावंत यांचीच सभा झाली. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवा आणि ठाण्यात सभा घेतली. दिवा दत्तक घेण्याची घोषणा करताना त्यांनी आयुक्तांच्या खांद्यावर बंदूकठेवत त्यांना आम्हीच आणले आणि शहराचा विकास केला, असे सांगितले. त्यामुळे यानंतरचा प्रचार हा आयुक्तांच्या अवतीभोवती फिरताना दिसला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आयुक्तांवर निशाणा साधला.९७ केंद्रे संवेदनशीलठाण्यात यंदा ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी निवडणूक पार पडेल. यातील ३२ प्रभागांत ४ आणि प्रभाग क्रमांक २९मध्ये प्रत्येकी ३ उमेदवार रिंगणात आहेत. १३१ जागांसाठी २५ पक्षांमधून ८०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महापालिका हद्दीत १,७०४ मतदान केंद्रे असून, त्यात ९७ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. परंतु, अतिसंवेदनशील केंद्र एकही नाही. ठाण्यात १२ लाख २९ हजार २६६ मतदार असून, त्यात ६ लाख ६७ हजार ८६८ पुरुष, ५ लाख ६१ हजार ३८५ महिला मतदार आणि १५ इतर मतदार आहेत.उल्हासनगरात ओमी कलानी रिंगणाबाहेर ज्या ओमी कलानी यांच्या पक्षबदलामुळे दीर्घ काळ उल्हासनगरचे राजकारण ढवळून निघाले, ते ओमी मात्र निवडणूक लढवू शकलेले नाहीत. तीन अपत्यांच्या मुद्द्यावरून त्यांचा अर्ज बाद झाला आहे. मात्र, त्यांचे बहुतांश समर्थक भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. उल्हासनगरला ७८ जागांसाठी ४७९ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी काढलेल्या रॅली, मतदारांच्या गाठीभेटींनीच प्रचाराचा शेवटचा दिवस गाजवला. प्रचारसमाप्तीनंतर लगोलग गुप्त बैठकांना सुरुवात झाली. अनेक प्रभागांतील वेगवेगळ्या पक्षांच्या रॅलीमध्ये आलटूनपालटून त्याच त्या महिला, पुरुष, मुले दिसत होती, ते त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य.प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उल्हासनगरात सर्व पक्षांनी घरोघर, गल्लीबोळांतील प्रचारावर भर दिला. सारे शहर कर्कश आवाज, घोषणांनी दुमदुमले. कडक उन्हातही प्रचाराचा जोर ओसरलेला नव्हता. वृद्ध तसेच महिला लहान मुलांना घेऊन प्रचार रॅलीत दिसत होत्या. गुप्त बैठकांना जोर : प्रचारसमाप्तीनंतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सोसायट्या, झोपडपट्टीतील कार्यकर्ते, व्यापारी संघटना, महिला मंडळ, सामाजिक संस्था, मंदिरांचे विश्वस्त आदींच्या भेटीगाठी व गुप्त बैठका सुरू केल्या आहे. मुख्यमंत्र्यांना उत्तर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत या दोघांनीच भ्रष्टाचार केल्याचा दावा करत प्रचारात रंगत आणली.