शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान वाढीसाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून जनजागृती अभियान जिल्हाभर जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 20:55 IST

जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंख्येत भरीव वाढ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने पाच तालुकापातळीच्या अधिकाऱ्यांची नोडल आॅफिसर म्हणून सीईओ सोनवणे यांनी नेमणूक केली. या अधिकाऱ्यांची बैठक घेवून मतदान जनजागृतीचा आराखडा तयार करून मतदान वाढवण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत मतदानाची प्रत्येक्ष टक्केवारी वाढविण्यासाठी स्विप ठाणे जिल्हा परिषदेची यंत्रणेने देखिल ग्रामीण भागात मतदान जनजागृती अभियान मतदान जनजागृतीचा आराखडा तयार करून मतदान वाढवण्यासाठी उपाययोजना

ठाणे : जिल्ह्यातील आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची प्रत्येक्ष टक्केवारी वाढविण्यासाठी स्विप कार्यक्र मांतर्गत विविध उपक्र म होती घेण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाणेजिल्हा परिषदेची यंत्रणेने देखिल ग्रामीण भागात मतदान जनजागृती अभियान राबवूप मोठ्याप्रमाणात जागृती केली. यासाठी जिल्हाभर नेमणूक केलेल्या नोडल आॅफिसरची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हिरालाल सोनवणे यांच्यासह अतिरिक्त सीईओ ब.भि. नेमाने यांनी मतदान जनजागृतीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंख्येत भरीव वाढ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने पाच तालुकापातळीच्या अधिकाऱ्यांची नोडल आॅफिसर म्हणून सीईओ सोनवणे यांनी नेमणूक केली. या अधिकाऱ्यांची बैठक घेवून मतदान जनजागृतीचा आराखडा तयार करून मतदान वाढवण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या. यामध्ये शिक्षण, महिला व बाल विकास, आरोग्य, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास यंत्रणा आदींच्या अधिकाऱ्यांनी राबवलेल्या कामकाजाचे यावेळी सादरीकरण केले. या जनजागृती कार्यक्रमाच्या आराखड्याव्दारे अठरा वर्षावरील कॉलेज युवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि बचत गट महिलाच्या मदतीने विविध वयोगटातील नागरिकांना मतदान केंद्रावर जावून मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील दिव्यांग मतदार, जेष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रावर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. शिवाय मागील लोकसभा निवडणुकीत ज्या भागात कमी मतदान झाले आहे , अशा ठिकाणी जास्तीत जास्त जनजागृती करावी अशा सूचना सबंधित नोडल अधिकाºयांना आजच्या आढावा बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीसाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल बनसोडे, सहाय्यक प्रकल्प संचालक एच. दोडके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, सहाय्यक गट विकास अधिकारी सुशांत पाटील, डॉ. कृपाली बांगर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषदVotingमतदान