शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

प्लास्टिक बंदीबाबत पालिकेने जनजागृती करावी , व्यापाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:16 IST

प्लास्टिक बंदीबाबत शहरातील व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन जगजागृती करण्याचे आवाहन केले.

उल्हासनगर : प्लास्टिक बंदीबाबत शहरातील व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन जगजागृती करण्याचे आवाहन केले.पालिका पथकाने प्लास्टिक बंदीच्या दोन दिवसात ४०जणांवर कारवाई करत अडीच लाखापेक्षा अधिक दंड वसूल केला. मात्र कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे याबाबतची माहिती पालिका अधिकारी, कर्मचारी व्यापाºयांना देत नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. शहरात प्लास्टिक पिशव्या बनवण्याचे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनविण्याचे असंख्य कारखाने असून कोटयवधी रूपयांची उलाढाल होते. सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाने शहरातील अनेक कारखाने बंद पडून कामगार बेरोजगार होणार आहे. जीन्स कारखान्यापाठोपाठ प्लास्टिक कारखान्यांवर गंडांतर आल्याने शहराचा आर्थिक कणा तुटल्याची प्रतिक्रीया व्यापाºयांनी व्यक्त केली.यावेळी उपमहापौर जीवन इदनानी, माजी आमदार कुमार आयलानी आदी उपस्थित होते. प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचे व्यापाºयांनी स्वागत केले. मात्र दंडात्मक कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. कोणकोणत्या पिशव्या व साहित्यावर बंदी आहे याबाबतची माहिती नागरिकांसह व्यापाºयांना देत जनजागृती करावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. महापालिका अधिकारी थेट दुकानात शिरून दंड आकारात असल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीला शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘प्लास्टिक बंदीबाबत सहकार्य करावे’भिवंडी : प्लास्टिक बंदीमुळे नागरिक व व्यापाºयांना त्रास होत आहे. परंतु भविष्याच्यादृष्टीने ही आवश्यक असल्याने नागरिक व व्यापाºयांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापौर जावेद दळवी यांनी केले. प्लास्टिक बंदीच्यानिमित्ताने व्यापाºयांसाठी कार्यशाळा झाली. आयुक्त मनोहर हिरे, अतिरीक्त आयुक्त अशोक रणखांब, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागाचे प्रादेशिक विभागीय अधिकारी धनंजय पाटील व सभागृह नेते प्रशांत लाड उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी प्लास्टिक बंदीची माहिती दिली. रणखांब यांनीही मागदर्शन केले. आयुक्त मनोहर हिरे यांनी उपस्थित व्यापारी वर्गाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्य सरकारच्या निर्णयात पालिका बदल करू शकत नाही, असे हिरे म्हणाले. धनंजय पाटील यांनी माहिती दिली.दंड वसुली थांबवण्याची मुख्याधिकाºयांकडे केली मागणीअंबरनाथ : अंबरनाथमधील व्यापारी संघटनेने मुख्याधिकाºयांची भेट घेत प्लास्टिक विरोधातील दंड वसुलीवर चर्चा केली. दंडात्मक कारवाई करत असताना व्यापाºयांच्या भूमिकेचा विचार केला जात नाही असे मत यावेळी व्यक्त केले. प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्याचा फटका व्यापाºयांना सहन करावा लागत असल्याचे मत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल यांनी व्यक्त केले. धल यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी देविदास पवार यांची भेट घेतली. जोवर पर्याय उपलब्ध होत नाही. तोपर्यंत दंडात्मक कारवाई थांबविण्याची मागणी संघटनेने केली. मात्र यास मुख्याधिकारी पवार यांनी प्रशासनाची भूमिका मांडताना कारवाई थांबविता येणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावर काही व्यापारी संतप्त झाले. सरकारचा निर्णय असल्याने त्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मत प्रशासनाने व्यक्त केले. तर दुकानदारांनी प्रशासनाला आपले निवेदन दिले आणि आपली भूमिका सरकारपर्यंत पोहचविण्याची मागणी केली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी