शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीआरटीएस माहित नाही, आधी अंतर्गत मेट्रोचा डिपीआर सादर करा, राष्ट्रवादीचा प्रशासनाला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:03 IST

कळवा, मुंब्य्रातील अंतर्गत मेट्रोचा वाद आता आणखी चिघळणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जो पर्यंत या मेट्रोचा डीपीआर सादर होत नाही, तो पर्यंत महासभा होऊ देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

ठळक मुद्देदिवा, पडले, दातिवली भागातही हवी मेट्रोश्रेयवादाची लढाई चिघळणार

ठाणे - पीआरटीएस वैगेरे आम्हाला काही माहिती नाही, आधी कळवा, मुंब्य्राच्या अंतर्गत मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या महासभेत ठेवा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. अन्यथा महासभा उधळून लावू असा इशाराही त्यांनी दिला आहे. याशिवाय या मेट्रोचे काम ठाण्यातील अंतर्गत मेट्रो सोबतच सुरु करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे कळव्यातील अंतर्गत मेट्रोचा वाद आता आणखी चिघळणार असल्याचेच दिसत आहे.            मागील महिन्यात कळवा, मुंब्य्रासाठी मेट्रो द्यावी अशा आशयाचे फलक राष्ट्रवादीतर्फे कळवा, मुंब्रा भागात लावण्यात आले होते. परंतु अगदी दोनच दिवसात कळवा, मुंब्रासाठी मेट्रो दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानल्याचे फलक शिवसेनेकडून लावण्यात आले होते. त्यामुळे अंतर्गत मेट्रोच्या निमित्ताने पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगल्याचे पहावयास मिळाले. आपल्या कामाचे श्रेय शिवसेनेने घेतल्याने हे राष्ट्रवादीच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. त्यामुळेच आता येत्या महासभेत कळवा, मुंब्य्रातील अंतर्गत मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा अन्यथा महासभा चालू देणार नसल्याचा इशारा आव्हाडांनी बुधवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांच्या समवेत शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक सुहास देसाई आदी उपस्थित होते. केवळ कळवा, मुंब्य्रापर्यंत ही अंतर्गत मेट्रो सिमीत न ठेवता, पडले, दिवा, दातिवली या भागातही ती नेण्याची मागणी त्यांनी केली आहे.एकूणच जो पर्यंत अंतर्गत मेट्रोचा डिपीआर सादर होत नाही, तो पर्यंत कोणतीही महासभा सुरु होता देणार नसल्याचे आव्हाडांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस