शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांविरुद्ध चिथावणीखोर बदनामीकारक वक्तव्य: नारायण राणेंविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 22:23 IST

महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बदनामीकारक तसेच समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करुन चिथावणी दिल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे तक्रारीपूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांचीही घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बदनामीकारक तसेच समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करुन चिथावणी दिल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी म्हस्के यांच्यासह शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोरच राणे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.महापौर म्हस्के यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, २३ आॅगस्ट २०२१ रोजी महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्टÑाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून ‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, अशी विधाने केली.मुख्यमंत्र्यांविरुद्ध बदनामीकारक आणि द्वेषभाव निर्माण करणारी विधाने केली. त्यामुळेच सोशल मिडिया, इलेक्ट्रीक मिडिया आणि वर्तमानपत्राद्वारे मुख्यमंत्री या घटनात्मक पदाच्या व प्रतिष्ठीत राजकीय व्यक्तीमत्वाच्या लौकिकाला बाधा येईल. त्यांची बदनामी होईल, असे वक्त व्य केले. त्यामुळेच पक्षीय कार्यकर्त्यांमुळे ठाणे शहरात संघर्ष निर्माण होऊ शकतो. यात राणे यांचे वक्त व्यच कारणीभूत ठरु शकते. राणे यांच्या वक्त व्यामुळे राजशिष्टाचाराचाही अपमान झाल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात कलम ५००, ५०५ (२) आणि १५३- ब नुसार गुन्हा दाखल झाला आहे.* काय सांगते कलम ५००- एखाद्याची बदनामी करणे.* कलम ५०५ (२)- वर्गावर्गात द्वेषभाव किंवा दुष्टावा निर्माण किंवा वाढविणारे विधाने करणे* कलम- १५३- बेछूटपणे, चिथावणीखोर वक्त व्य करुन दंगलीचा अपराध घडावा असा उद्देश. यात एक वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.२-शत्रुत्वाची किंवा द्वेषाची भावना निर्माण करणारे वक्तव्य करणे* या कलमांद्वारे तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.-------------मंत्री पदाचे गाजर दाखवून भाजपने शिवसेनेवर भुंकणारा प्राणी पाळलेला आहे. अशा शब्दात नाव न घेता राणे यांच्यावर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी टीका करत निशाणा साधला आहे. यावेळी शहर प्रमुख हेमंत पवार, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीNarayan Raneनारायण राणे