शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

प्रांत आदेशाची अंमलबजावणी नाही

By admin | Updated: December 28, 2015 02:27 IST

२७ गावांतील मौजे दावडी आणि सोनारपाडा गावच्या कुळ शेतकऱ्यांच्या जमिनींचे बोगस फेरफारद्वारा झालेले बनावट हस्तांतरण प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.

अरविंद म्हात्रे, चिकणघर२७ गावांतील मौजे दावडी आणि सोनारपाडा गावच्या कुळ शेतकऱ्यांच्या जमिनींचे बोगस फेरफारद्वारा झालेले बनावट हस्तांतरण प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. यामुळे कल्याण तहसील कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे.कल्याण तहसील कार्यालयांतर्गत २७ गावातील दावडी आणि सोनारपाडा येथील कूळ शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूमाफीयांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून दि. १६ जाने २०१२ रोजीच्या ४६२, ४६३ या दोन फेरफारद्वारा बोगस हस्तांतरण घडवून आणले होते. शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर कल्याणचे प्रांत अधिकारी धनंजय सावळकर यांनी चौकशीअंती ५६० या नव्या फेरफारद्वारा (१४.०८.२०१४) ४६२,४६३ हे बनावट फेरफार रद्द ठरवून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम ८५, ८७ व १४९ तसेच मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८चे कलम ८८ (ब)(२) व तुकडेबंदी कायद्यातील तरतूदीनुसार सदर जमीन सरकारजमा करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार किरण सुरवसे यांना दिले होते. (आॅगस्ट २०१४) मात्र यानंतर ६० दिवसांनी तरी अद्याप काहीच कारवाई झालेली नसल्याने तक्रारदार शेतकरी गणेश म्हात्रे यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसेंची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. प्रांताच्या आदेशाला तहसीलदार कार्यालयाने अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून तात्पुरती स्थगिती आणली मात्र स्थगितीची मुदत संपली असूनही अद्याप कारवाई नाही. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन त्वरित होणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नसल्याने ४९० दिवसानंतरही कारवाई झाली नाही.गत पाच वर्षात १५ जण (तहसीलचे) ट्रॅप झाले. यामुळेही तहसीलदारांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे समोर आले.विशेष म्हणजे या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन तत्कालीन आ. नितीन सरदेसाई, रमेश पाटील, आ. दौलत दरोडा यांनी याप्रकरणी तारांकित प्रश्न (४००५)उपस्थित करून चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर असा प्रकार घडलाच नसल्याचे देऊन सभागृहाची दिशाभूल करण्यात आली. कारण कल्याण तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिलेल्या अहवालाचे वाचन मंत्र्यांनी केला. कारण हा प्रकार झालाच नाही मग ते ४६२,४६३ फेरफार रद्द का केला आहे या प्रकरणामुळे कल्याण तहसील कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.