शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजारांची मदत, केडीएमटीच्या अर्थसंकल्पात तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 00:29 IST

भांडवली आणि महसुली अनुदानाबरोबरच भविष्य निर्वाह निधीत वाढ करताना मृत कर्मचा-याच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे.

कल्याण : केडीएमटी व्यवस्थापनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये वाढ करत परिवहन समितीने ९८ कोटी ७४ लाख रुपये जमा व ९६ कोटी ६४ लाख रुपये खर्च, अशा दोन कोटी १० लाख रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पाला बुधवारी पार पडलेल्या विशेष सभेत एकमताने मान्यता दिली. भांडवली आणि महसुली अनुदानाबरोबरच भविष्य निर्वाह निधीत वाढ करताना मृत कर्मचा-याच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. आता हा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला जाईल.उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी ९१ कोटी ३५ लाख जमेचा व ८९ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा शिलकी अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला होता. यात समितीने सात कोटी ३९ लाखांची वाढ केली आहे. भांडवली तरतूद म्हणून व्यवस्थापनाकडून पाच कोटी रुपये ठेवण्यात आले होते. यात समितीने दोन कोटींची वाढ केली आहे. महसुली अनुदानासाठी ३० कोटींची तरतूद होती. यात एक कोटींची वाढ केली आहे. कर्मचारी थकीत देणी रक्कम पाच कोटींवरून आठ कोटी करण्यात आली आहे. कार्यशाळा कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी १० लाखांची तरतूद होती, त्यात ४० लाखांची वाढ करण्यात आली आहे. इमारत दुरुस्तीसाठी २५ लाख, आॅइल खरेदी २५ लाख, बस धुण्यासाठी (वॉशिंग) पाच लाखांची तरतूद ठेवली आहे. भविष्य निर्वाह निधीच्या हिश्श्यासाठीही दोन कोटींची तरतूद समितीने ठेवली आहे.विशेष म्हणजे मृत कर्मचाºयाच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजार रुपये आर्थिक मदत करण्यासाठी अर्थसंकल्पात पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे. बुधवारच्या समितीच्या सभेत अर्थसंकल्पावर चर्चा करताना सदस्यांच्या सूचनाही विचारात घेण्यात आल्या. या सूचनांवर व्यवस्थापनाने कार्यवाही करावी, असे आदेश देताना सभापती मनोज चौधरी यांनी अर्थसंकल्प मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले.‘उत्पन्नात मोठी वाढ झाली पाहिजे’महिनाभरात केडीएमटीच्या उत्पन्नात वाढ झालीच पाहिजे, असे मत चर्चेदरम्यान सर्वपक्षीय सदस्यांनी मांडले. केडीएमसीच्या अनुदानावर अवलंबून न राहता उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना करताना शिवसेनेचे सदस्य सुनील खारूक यांनी महासभेकडून अर्थसंकल्पात मंजूर केली जाणारी तरतूद पूर्णपणे मिळते का, असा सवाल केला.बसवर फलक नसल्याने बस कोणत्या मार्गासाठी चालते, याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळेही उत्पन्नावर परिणाम होत असल्याचा मुद्दा शिवसेनेचे सदस्य मधुकर यशवंतराव यांनी मांडला.आम्ही दोन वर्षांपूर्वी समितीवर आलो, तेव्हा दैनंदिन उत्पन्न सहा लाख होते. परंतु, ते आता साडेतीन लाखांपर्यंत खाली का आले, याचा खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे सदस्य प्रसाद माळी यांनी केली.यंदाच्या वर्षात १३७ बस चालविण्याचे उद्दिष्ट उपक्रमाचे आहे. कर्मचाºयांच्या नियुक्त्या आणि सुटे भाग खरेदीसाठी निविदा काढल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नात फरक पडेल, असा दावा व्यवस्थापनाने केला.पनवेल, भिवंडी, एमआयडीसी या जादा उत्पन्न देणाºया मार्गावर बसफेºया वाढवा, असे आदेश चौधरी यांनी दिले. नवनीतनगर, दावडी व लोढा हेवन येथेही जादा बस सोडण्याची मागणी संजय पावशे यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही व्हावी, याकडेही चौधरी यांनी लक्ष वेधले.केडीएमटी बसथांब्यांचे पालटणार रूपडे, लवकरच स्टेनलेस स्टीलचे थांबकल्याण : महापालिकेचा उपक्रम असलेल्या केडीएमटीचे बसथांबे मोडकळीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लवकरच शहरात स्टेनलेस स्टीलचे बसथांबे उभारले जाणार असल्याने त्यांचे रूपडेच पालटणार आहे. पहिल्या टप्प्यात १५० थांबे उभारले जाणार असून व्यवस्थापनाने त्याचा प्रस्ताव शुक्रवारी होणाºया परिवहन समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.केडीएमटीचे सध्याचे बसथांबे हे गंजले आहेत. त्यांची देखभाल-दुरुस्तीच होत नसल्याने त्यांची ही अवस्था झाली आहे. या थांब्यांचा कपडे वाळत घालण्यासाठीही वापर होत असल्याचे चित्रही काही भागांत दिसते. त्यामुळे हे थांबे प्रवाशांसाठी निरुपयोगी ठरले आहेत. आता हे थांबे काढून त्याजागी स्मार्ट सिटीअंतर्गत नवीन स्टेनलेस स्टीलचे १५० बसथांबे पहिल्या टप्प्यात बसवले जाणार आहेत.त्याचबरोबर प्रवाशांच्या मागणीनुसार दुसºया टप्प्यात ५० स्टेनलेसचे बसथांबे उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भातील निविदेचा प्रस्ताव व्यवस्थापनाने मंजुरीसाठी शुक्रवारच्या परिवहनच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.यासंदर्भात तिघांच्या निविदा उपक्रमाकडे आल्या होत्या. यातील एक निविदा अपात्र ठरली, तर दोघांमध्ये अटी-शर्तींची पूर्तता करणाºया मे. सन एन. स्टार अ‍ॅडव्हर्टायझिंग प्रा.लि. यांची निविदा उपक्रमाकडून स्वीकारण्यातआली आहे.शून्य भांडवलावर उभारणार थांबेकंत्राटदाराकडून स्वत:च्या खर्चाने हे बसथांबे उभारण्यात येणार आहेत. त्यांनीच पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करायची आहे. तसेच उपक्रमाला मंजूर दराने कंत्राटदाराकडून भाडे दिले जाणार आहे.पण, त्याबदल्यात स्टेनलेस स्टीलच्या थांब्यांवर जाहिरात प्रसिद्ध करून त्याचे उत्पन्न कंत्राटदार घेणार आहे. त्यामुळे शून्य भांडवलावर परिवहनकडून हा उपक्रम राबवला जाणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली