शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी, लोकवस्तीच्या परिसरात मोफत होमिओपॅथीक, आयुर्वेदिक औषधे पुरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 16:27 IST

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव डोळ्यासमोर ठेवून आता आयुक्त विजय सिंघल यांनी झोपडपटटी भागात तसेच दाट लोकवस्तीच्या भागात होमियोपॅथीच्या गोळ्या व आर्युवेदीक औषधे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरवात आजपासून करण्यात आली.

ठाणे : झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या परिसरामध्ये कोरानाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी गुरुवारपासून आयुष मंत्रालयाने शिफारस केलेली आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक औषधे वितरित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला. दरम्यान धोकादायक इमारतींना दुरस्ती देताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची पूर्ण खातरजमा करूनच देण्यात याव्यात अशा सूचनाही सिंघल यांनी सर्व प्रभागस्तरिय अधिकाऱ्यांना दिल्या.                          प्रतिबंधित क्षेत्रात जेवढी कडक अंमलबजावणी करता येईल तितकी कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. सर्व अधिकारी चांगले काम करीत आहेत असे अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी परिमंडळ उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसींग करताना अतिशय काळजीपूर्वक करावे, प्रत्येक कोरोना बाधित रूग्णांचे अति जोखीम गटातील व्यक्ती तसेच कमी जोखीम गटातील व्यक्तींची तात्काळ वर्गवारी करावी, बाधित रूग्णांना तातडीने स्थलांतरित करावे जेणेकरून त्याच्यामुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होवू नये, कंटेनमेंट झोनच्या बाहेर कोरानाचा संसर्ग वाढू नये, कोरोना बाधितांची संख्या कुठे वाढत आहे, कशामुळे वाढते आहे याचा व्यविस्थत अभ्यास करावा अशा अनेक महत्वाच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान आयुष मंत्रालयाने सुचिवलेल्या होमिओपॅथी व आयुर्वेदिक गोळ्या उद्यापासून दाट लोकवस्ती व झोपडपट्टी असलेल्या परिसरात वितरित करण्यात येणार आहेत. यामध्ये वागळे प्रभाग समितीमधील सी. पी. तलाव, किसननगर, पाईपलाईन, लोकमान्यनगर आणि मुंब्रा या ठिकाणी सुरूवातीस वितरित करण्यात येणार आहेत. झोपडपट्टी, दाट लोकवस्तीच्या परिसरात मोफत होमिओपॅथीक, आयुर्वेदिक औषधे पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या