शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जैन समाजाची बदनामी करणाऱ्या तसच अपप्रचार करणाºया अनोप मंडल संस्थेचा ठाण्यात निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 23:41 IST

जैन आचार्य यांचा पुतळा जाळून त्यांचा अवमान करणाºया तसेच समाजाची बदनामी करीत जैन समाजाचा अपप्रचार करणाºया अनोप मंडल या संस्थेचा ठाण्यातील तमाम जैन बांधवांनी रविवारी सकाळी टेंभी नाका येथील श्री ऋषभदेव महाराज जैन धर्म मंदिर याठिकाणी निषेध करीत आंदोलन केले. या आंदोलनामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

ठळक मुद्देजैन समाज बांधवांनी केले आंदोलनजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: जैन आचार्य यांचा पुतळा जाळून त्यांचा अवमान करणाºया तसेच समाजाची बदनामी करीत जैन समाजाचा अपप्रचार करणाºया अनोप मंडल या संस्थेचा ठाण्यातील तमाम जैन बांधवांनी रविवारी सकाळी टेंभी नाका येथील श्री ऋषभदेव महाराज जैन धर्म मंदिर याठिकाणी निषेध करीत आंदोलन केले. या आंदोलनामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. राष्टÑपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे यासंबंधी कारवाईचे निवेदन जैन संघटनेच्या वतीने देण्यात आले.श्री राजस्थान श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ, ठाणे आणि श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल अ‍ॅन्ड ज्ञाती ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम सोलंकी आणि व्यस्थापकीय विश्वस्त उदय परमार यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनोप मंडल ही जैन आणि हिंदू विरोधी संघटना असून राजस्थान, गुजरात, महाराष्टÑ, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील ग्रामीण भागात जैन धर्म, जैन साधू आणि साध्वी यांच्याविरुद्ध लोकांच्या मनात विपर्यस्त विचार पसरविण्याचे काम करीत आहेत. भारतासह जगभरात येणारे प्रत्येक संकट आणि नैसर्गिक आपत्तीला जैन लोक कारणीभूत असल्याचा अपप्राचारही ही संघटना गावा गावात करीत आहे. भूकंप, महापूर, आतंकवादी हल्ले आणि ग्लोबल वार्मिंगलाही जैन समाजच कारणीभूत असल्याचे नाहक पसरविले जात आहे. जैन साधू आणि साध्वी हे काळी जादू करुन महापूर, कोरोनासारखे साथीचे आजार आणल्याचाही या अपप्रचारात समावेश आहे. रस्ते अपघातात अनेक पायी जाणाºया जैन साधू आणि साध्वींचे अपघाती निधन झाले आहे. शेकडो साधूंच्या या अपघाती मृत्यु होण्यामागेही अनोप मंडल संघटनेचा हात असण्याची भीतीही जैन संघटनेने व्यक्त केली आहे. अनोप मंडलची चौकशी केली जावी. या संस्थेचे प्रमुख मुकनाराम प्रजापती यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर कडक कारवाई केली जावी. त्याचबरोबर या संस्थेकडून चालविण्यात येणारे संकेतस्थळ, ट्वीटर, एफबी, व्हॉटसअ‍ॅप आणि यूटयूब सारखी सोशल मिडियाची खातीही बंद केली जावी. तसेच या मंडळाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावेळी जैन समाजाच्या १४ संघटनांचे पदाधिकारी तसेच १५० महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :thaneठाणेJain Templeजैन मंदीरcollectorजिल्हाधिकारी