शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण, दमबाजी, दबाव आणण्याच्या विरोधात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

By सुरेश लोखंडे | Updated: September 15, 2023 19:59 IST

ठाणे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन या कृतीचा निषेध केला.

ठाणे : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य काम करून घेण्यासाठी दबाब आणण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यांना मारहाण, दमबाजीला बळी पडावे लागले आहे. अशा मानसिक खच्चीकरण करणाऱ्या गोष्टींपासून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या भा.दं.वि. ३५३ कायद्यामधील तरतुदी कमी करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहे. त्या कृतीविरुद्ध शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्यस्तरीय निषेध दिन पाळण्याचे आंदोलन छेडण्यात आले. त्यात ठाणे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन या कृतीचा निषेध केला.       

महासंघाच्या आवाहनानुसार अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी या निवेदनाची प्रत निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांना दिली. यावेळी समितीचे सरचिटणीस जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, मुद्रांक जिल्हाधिकारी नारायण राजपूत, तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी, तहसिलदार संजय भोसले, नायब तहसिलदार स्मिता गुरव आदी यावेळी उपस्थित होते. प्रत्येक शासकीय अधिकारी -कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीत असतो.

परंतु नियमात न बसणारी कामे नियमबाह्यपणे करून घेण्यासाठी शासकीय अधिकारी - कर्मचाऱ्यांवर विविध क्षेत्रातील बड्या व्यक्तींकडून  दबाव आणण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यात काही अधिकारी, कर्मचारी अनिच्छेने किंवा दबावाला बळी पडून, अशी कामे मार्गी लावण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करताना आढळतात. पण जे प्रामाणिकपणे आणि दबावाला बळी न पडता कामे करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना नाहकपणे समाजाविघातक प्रवृत्तीं, व्यक्तींकडून मारहाण-दमबाजीला बळी पडावे लागते. या मनमानी विरोधात ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी वर्गाने निषेध दिन पाळून शासनाच्या कृतीचा निषेध केला आहे.

टॅग्स :thaneठाणे