शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महिला दिनी सेनेच्या महिला सैनिकांचा भाजपाच्या पारदर्शकतेविरोधात निषेध

By admin | Updated: March 8, 2017 21:53 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातुन प्रथमच साजरा होणाऱ्या जागतिक महिला

राजू काळे/ऑनलाइन लोकमत भार्इंदर, दि. 8  - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातुन प्रथमच साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनाला सेनेकडुन निषेधाच्या माध्यमातुन गालबोट लावण्यात आले. भाजपाने छापलेल्या कुपन्सवर बेकायदेशीर पालिकेचे नाव वापरल्याने सेनेने भाजपाच्या पारदर्शकतेला विरोध करुन बुधवारी पालिका मुख्यालयात काळे झेंडे दाखवुन प्रशासकीय कारभाराचा निषेध केला. तसेच महापौर गीता जैन यांनीही प्रशासनाने छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचार न पाळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त केला.पालिकेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन आयोजित कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली होती. त्यासोबत महिला अधिकारी, कर्मचाय््राांसह नगरसेविकांना भेटवस्तुच्या स्वरुपात कुपन्स देखील छापण्यात आले होते. याचा गैरफायदा घेत भाजपाने आपल्या काही महिला पदाधिकाऱ्यांना भेट वस्तु देण्यासाठी सुमारे २०० कुपन्स पालिकेच्या नावाचा वापर करुन छापली. याची कुणकूण लागताच सेनेने त्याला विरोध दर्शविला. परंतु, वेळीच त्याचा निषेध न करता निषेधाचा मुहुर्त जागतिक महिला दिनावेळी निश्चित केला. याची माहिती पालिका अधिकाऱ्य़ांना मिळताच त्यांनी बुधवारी कार्यालयातुनच माघारी फिरणे पसंत करुन आपला मोबाईल स्विच आॅफ केला. त्यामुळे सेनेच्या आंदोलनाचा फियास्को होणार, हे निश्चित झाले असतानाही सेनेने उपमहापौर प्रवीण पाटील व स्थायी सभातपी प्रभाकर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पालिका मुख्यालयात प्रशासनाच्या विरोधात काळे झेंडे दाखवुन निषेध व्यक्त करण्याचा निर्धार केला. त्यानुसार बुधवारी सेनेच्या महिला नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांनी उपमहापौरांच्या दालनात जमण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रशासनासह भाजपाच्या पारदर्शक कारभाराविरोधात घोषणाबाजी करुन आयोजित कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. याला प्रशासनच कारणीभूत असल्याचा दावा यावेळी निदर्शकांमार्फत करण्यात आला. परंतु, आयुक्तांसह कोणताही संबंधित अधिकारी मुख्यालयात उपस्थित नसल्याने निदर्शकांनी पहिल्या मजल्यावरील महिला व बाल कल्याण विभागाचे वरीष्ठ लिपिक दामोदर संख्ये यांनाच घेराव घालुन त्यांना निवेदन दिले. मात्र यावरुन सेनेविरोधात कर्मचाय््राांमध्ये नाराजी पसरली आहे. यावर बोलताना एका कर्मचाय््रााने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, ज्यावेळी हा प्रकार लक्षात आला, त्याचवेळी म्हणजेच महिला दिनाच्या आदल्या दिवशी सेनेने निषेध व्यक्त करुन आयुुक्तांना निवेदन देणे आवश्यक होते. यामुळे दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रम आयोजनावर फरक पडला असता. मंगळवारी आयुक्तांसह संबंधित अधिकारी मुख्यालयात हजर होते. परंतु, सेनेने ऐन जागतिक महिला दिनी व्यक्त केलेला निषेध सक्षम अधिकाय््रााकडे व्यक्त करण्याऐवजी कर्मचाय््रााकडे व्यक्त करणे अपेक्षित नाही. याबाबत महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापती व सेनेच्या नगरसेविका शुभांगी कोटीयन म्हणाल्या, निषेधाचे निवेदन आयुक्तांचे स्वीय सहाय्यक तसेच समितीचे कर्मचारी संख्ये यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच सभापती डिंपल मेहता यांना मोबईलवरुन संपर्क साधला असता तो त्यांचे पती विनोद मेहता यांनी उचलुन प्रतिक्रिया देण्यास टाळले. महापौर गीता जैन म्हणाल्या, पालिका प्रशासनाने निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचाराचे पालन केलेले नाही. नियमाप्रमाणे महापौरांचे नाव निमंत्रकामध्ये छापणे आवश्यक असतानाही त्याला बगल देण्यात आल्याने कार्यक्रमावर माझा बहिष्कार आहे. तसेच भाजपाच्या स्वखर्चाने छापलेल्या कुपन्सवर चुकीने महापालिकेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर मित्र पक्षाने एकत्र बसुन चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता निषेध करणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे आयुुक्त डॉ. नरेश गीते म्हणाले, पालिकेने आयोजित केलेला महिला दिनाचा कार्यक्रम नियमानुसारच केला असुन तो महत्वाचा असल्याने त्यात कोणत्याही प्रकारचा गैरजबाबदारी झालेली नाही.