शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा इमारतीला संरक्षण, सहायक आयुक्तांना नोटीस; खुलासा न केल्यास निलंबनाचा बांगर यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 08:27 IST

या नोटिसीला तीन दिवसांत उत्तर देणे बंधनकारक आहे, अन्यथा शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, असा इशारा दिला आहे.

ठाणे - कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत जय भारत मैदानाच्या शेजारी अवघ्या चार महिन्यांत आठ मजली अनधिकृत इमारत उभी राहिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरही कळवा प्रभाग समितीकडून या इमारतीवर कारवाई न झाल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गंभीर दखल घेऊन कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली. 

या नोटिसीला तीन दिवसांत उत्तर देणे बंधनकारक आहे, अन्यथा शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, असा इशारा दिला आहे. बेकायदा इमारतीवर पालिकेने यापूर्वी कारवाईचा देखावा केला होता. त्यानंतरही ही इमारत पुन्हा उभी राहिल्याचे दिसून आले आहे. मात्र यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध होऊनही निर्ढावलेल्या स्थानिक विकासकांकडून अनधिकृत इमले चढविणे सुरूच होते. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली. कळवा प्रभाग समितीत कांदळवन क्षेत्रात भराव टाकून अनधिकृत बांधकाम केले जात असल्याच्या तक्रारी आल्याचेही या नोटिसीत म्हटले आहे. तत्कालीन सहायक आयुक्त सचिन बोरसे, समीर जाधव व सध्याचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे संजय घाडीगावकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

आयुक्तांनी काय म्हटले आहे नोटिसीत?बेकायदा बांधकामावर वेळीच कारवाई न झाल्याने तथा दिखाऊ व जुजबी कारवाई होत असल्याने अप्रत्यक्षपणे आपण अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार ही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून, आपल्या विरोधात शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई का करू नये, असा सवाल उपस्थित करीत तीन दिवसांत याचा खुलासा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. खुलासा केला नाही तर शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई केली जाईल, असे नोटिसीत स्पष्ट केले आहे.