शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाई दरू करण्यासाठी आव्हाडांचे पालकमंत्र्यांसह इतर तीनही आमदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 16:14 IST

ठाणे शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून शाई धरण मार्गी लावण्याची विनंती त्यांनी केली आहे. यासाठी पक्षभिनिवेश बाजूला ठेवून काम करुया आणि पाणी टंचाई दूर करुया अशी सादही त्यांनी घातली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईवर मात करण्यासाठी धरण महत्वाचेशिवसेनेच्या तीनही आमदारांनी घातली साद

ठाणे - ठाण्यातील वाढती पाणी टंचाई लक्षात भविष्यात पाण्याचे आणखी हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षभिनिवेश बाजूला सारुन ठाण्यासाठी मंजुर झालेले शाई धरण मार्गी लावूया अशी सार्थ हाक राष्ट्रवादीचे कळवा- मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील इतर तीनही आमदारांना घातले आहे. त्यामुळे आता किती आमदार त्यांच्या या हाकेला ओ देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.               या संदर्भात त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर आणि सुभाष भोईर यांना एक पत्र लिहिले असून त्याच्या माध्यमातून ही साद घातली आहे. ठाण्यात पाण्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. हिरानंदानी मेडोजसारख्या सर्वात महागड्या गृहसंकुलांना सुद्धा टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. आज घोडबंदरचा पट्टा हा पाण्यावाचून त्रस्त आहे. जी परिस्थिती घोडबंदरला आहे तीच परिस्थिती दिवा, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट या परिसरामध्ये आहे. काही ठिकाणी ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधून थेट पाणी कनेक्शन घेऊन दादागिरी करु न काही विभागामध्ये पाणी दिले जाते. परंतु, या सगळ्याचा परिणाम हा पाणी वितरणावर होतो आणि अख्ख्या ठाणेकरांना त्याचे भोग भोगावे लागत आहेत. गेल्या २५ ते ३० वर्षांमध्ये पाणी वितरणाबाबत धाडसाने महानगरपालिकेने काम केले असे काहीच दिसत नाही. पण, त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपले स्वतंत्र स्त्रोत्र नसल्यामुळे एम. आय. डी. सी. मध्ये होणारे शटडाऊन आणि स्टेमचा होणारा शटडाऊन यामुळे अनेकवेळा ४-४ दिवस विविध भागांमध्ये पाणी नसल्याचे आढळून आले आहे. खरतर आतापर्यंत आपण आपले स्वत:च स्त्रोत्र म्हणजेच एक धरण उभे करायला हवे होते. पण, दुर्देवाने ते घडू शकले नसल्याची खंतही त्यांनी यात व्यक्त केली आहे. परंतु यामध्ये आता कुठल्या पक्षाला दोष मात्र त्यांनी दिलेला नाही. सध्याची ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज ही परिस्थिती पाहता आणि गेल्या ५ वर्षांचा अनुभव पाहता पावसाळाही हळुहळु पुढे सरकत चालला आहे. पूर्वी जूनच्या ७ तारखेला येणारा पाऊस आता जूलैच्या पहिल्या आठवड्यात सुरु होत आहे. उन्हाळा जो पहिला एप्रिल मध्ये सुरु व्हायचा तो आता फेब्रुवारी-मार्च मध्ये सुरु होतो. त्यामुळे पाऊसही कमी पडत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला अधिक पाणी तुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपले स्वतंत्र धरण असणे फार गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका आणि शासनाची मदत घेऊन जे शाई धरण २००३ साली मंजूर केले होते. त्या धरणाबाबत अंतिम भूमिका घेऊन त्याच्या बांधकामाला सुरवात करुया अशी साद त्यांनी या पत्राच्या माध्यमातून घातली आहे. राजकारण बाजूला ठेवूयात आणि आपल्या ठाण्याचा पाणी प्रश्न हा कायमचा सोडवूया असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस