शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
3
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
4
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
5
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
6
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
8
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
9
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
10
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
11
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
12
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
13
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
14
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
15
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
16
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
17
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
18
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
19
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
20
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...

भिवंडीतील वारांगनांना मिळाली जगण्याची दिशा, महिलांना दिला जातो पौष्टिक आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 00:38 IST

तहसीलदार व उद्योगपतींच्या माध्यमातून अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळाले.

नितीन पंडित भिवंडी : भिवंडीतील देहविक्रय करणाऱ्या महिलांची वस्ती असलेली हनुमान टेकडी परिसर म्हणजे जणूकाही बदनाम वस्ती. या बदनाम वस्तीत नेहमी गिºहाइकाच्या शोधात भिरभिरणाºया नजरांनी खुणावणारे हात आता अगरबत्ती पॅकिंग करण्यात गुंतले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी येथील महिलांसाठी काम करणाºया श्री साई सेवा संस्थेच्या प्रमुख स्वाती खान यांच्या पुढाकाराने लॉकडाऊन काळात देहविक्रय न करण्याची शपथ घेतली. पण लॉकडाऊन वाढल्याने यांची चिंता वाढली. तेव्हा त्यांनी आपली व्यथा खान यांच्यापुढे मांडली. त्यांनी तहसीलदार व उद्योगपतींच्या माध्यमातून अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळाले.अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून येथील ५६५ महिलांना वेळोवेळी अन्नधान्य, इतर जीवनावश्यक साहित्याचे वितरण झाले. परंतु लॉकडाऊन वाढत गेला तशी येथील महिलांची तगमग वाढली. दोनवेळचे जेवण मिळते. पण इतर खर्चासाठी, घरभाड्यासाठी कुणाकडे हात पसरणार या वेदनेतून महिलांनी आम्हाला काम पाहिजे, यासाठी तगादा लावला होता.खान यांनी प्रयत्न करुन या महिलांना अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळवून दिले. येथील काम करण्यास उत्सुक असलेल्या २५ महिलांची प्रथम यासाठी निवड करून त्यांना १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळाले. या प्रशिक्षण कालावधीत महिलांना २१० रुपये प्रतिदिन मानधन स्वरूपात दिले. सायंकाळी महिलांना हळददूध व उकडलेले अंडे असा पौष्टिक आहार दिला जातो. त्यांना प्राणायामचे धडे दिले जातात.>मुलांनाही स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण : लॉकडाऊनच्या काळात आम्हाला संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य मुबलक मिळाले. पण या कामाने आमची पैशांची नड दूर झाली असून हे काम असेच सुरु राहिले तर आपण देहविक्रीच्या व्यवसायातूनही बाहेर पडू, असा विश्वास देहविक्रय करणाºया एका महिलेने बोलून दाखविला . येथील देहविक्रय करणाºया महिलांसोबत त्यांच्या मुलांनाही स्वयंरोजगार करता यावा, यासाठी सध्या दिवे बनवणे, तोरण बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात असून या सर्व कामांतून जगण्याची नवी ऊर्जा मिळत असल्याचे महिलांनी बोलून दाखविले.