शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वृक्ष प्राधिकरण विभागाच्या पटलावर ४६० वृक्ष तोडीचे प्रस्ताव, पुनर्रोपणाचा मार्ग मात्र खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 17:42 IST

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे पुन्हा एकदा ४६० वृक्ष तोडीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आले आहेत. परंतु आधीच्याच वृक्ष तोडीच्या बदल्यात पुनर्रोपण करण्यात अडचणी असतांना आता ४६० वृक्षांच्या बदल्यात २३०० वृक्षांचे पुनर्रोपण कसे केले जाणार हा मोठा प्रश्न या विभागाला सतावू लागला आहे.

ठळक मुद्दे४६० वृक्ष तोडीच्या बदल्यात २३०० वृक्षांची करावी लागणार लागवडअडथळ्यांची शर्यत करावी लागणार पार

ठाणे - ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे वृक्षतोडीचे चार प्रस्ताव दाखल झाले असून यामध्ये जवळपास ४६० वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. तर दुसरीकडे पुनर्रोपणाच्या नावाखाली वृक्ष तोडीला परवानगी देण्यात येत असली तरी आधीच ३ हजारांपेक्षा अधिक झाडांच्या पुनर्रोपणाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना आता आणखी ४६० झाडांची भर पडली असल्याने त्याच्या बदल्यात नवीन झाडे लावायची कुठे याबाबत अद्याप पालिका प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही.               कौसा येथील जोडरस्त्यांच्या कामांमध्ये जवळपास २,८७४ कोपरी रु ंदीकरणाच्या कामात २४२ तर मेट्रोच्या कामात १ हजारांपेक्षा अधिक झाडांची कत्तल होणार आहे. ही झाडे लावायची कुठे याबाबत अजूनही पालिका प्रशासनाचे निश्चित धोरण ठरलेले नाही. कौसा जोडरस्त्याच्या कामांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करायचे की आणखी काय करायचे याबाबत देखील वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे ही सर्व झाडे लावायची कुठे हा तिढा सुटलेला नसताना आता तब्बल ४६० वृक्ष तोडीचा प्रस्ताव विकासकांच्या मध्यातून वृक्ष प्राधिकरण विभागाकडे दाखल झाले आहेत. दिवा प्रभाग समितीच्या हद्दीमधील तीन रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. कल्याण फाटा दत्तमंदिर ते २५ मीटर डीपी रस्त्यांपर्यंत ३० मीटर रु ंद डीपी रस्त्याचे काम केले जाणार आहे. दुसरा कल्याण शीळ रस्त्यापासून घनकचरा प्रक्रि या केंद्राकरीत राखीव असणाऱ्या भूखंडाकडे जाणाºया २५ मीटर रुंद डीपी रस्ता तर तिसरा मिनार रेसिडेन्सी ते कल्याण शीळ रोडपर्यंत २५ आणि ४५ मीटर रु ंद डीपी रस्ता अशा तीन रस्त्यांमध्ये ३२३ वृक्ष बाधित होणार असून त्या झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे तर ४८ वृक्ष तोडले जाणार आहे.दुसरा प्रस्ताव मे. ओंमकार डेव्हलपर्स यांच्याकडून वृक्ष प्राधिकरण विभागाकडे आला असून यामध्ये २० वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. शीळ येथील सेक्टर ११ सर्व्हे नं २८ या ठिकाणी विकास करण्याचा हा प्रस्ताव आहे. तिसरा प्रस्ताव माजिवडा येथील मे. डिझाईन कन्सोटीयन यांच्याकडून आला असून या विकास कामांमध्ये जवळपास ११ वृक्षांचे पुनर्रोपण तर २ वृक्ष तोडली जाणार आहे. चौथा प्रस्ताव रेमंड कंपनीकडून दाखल करण्यात आला असून यामध्ये ४५ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असून ६ झाडे तोडली जाणार आहे. वर्तकनगर नं १ येथील सेक्टर ४ मध्ये ३० मीटर रुंद आणि ४५० मीटर लांब रस्त्यांच्या बांधकामांसाठी हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण विभागाकडे सादर करण्यात आला आहे. तर माजिवडा येथे एक धोकादायक वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव दाखल झाला असून असे एकूण तब्बल ४६० झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. परंतु आधीच्याच तोडण्यात येणाºया वृक्षांच्या पुनर्रोपणचा मार्ग खडतर असतांना या वृक्षांचे पुनर्रोपण कशा पध्दतीने केले जाणार हा मोठा प्रश्न वृक्ष प्राधिकरण विभागाला पडला आहे. एका झाडाच्या मोबदल्यात पाच नवीन वृक्ष लागवड करणे असे धोरण आहे. त्यानुसार ४६० वृक्षांच्या बदल्यात २३०० वृक्ष लावावे लागणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त