शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागरीकांच्या अभिरुप महासभेतून आयुक्तांचा सभात्याग, विरोधी पक्षनेत्यांनी मांडला बदलीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 15:37 IST

सलग दुसऱ्या दिवशी ठाणे मतदाता जागरण अभियानच्या वतीने अभिरुप महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांच्या बदलीचा प्रस्ताव मांडला. परंतु आयुक्तांनी याचा निषेध नोंदवित सभात्याग केला.

ठळक मुद्देआयुक्तांच्या कार्यकाळाचे कौतुकभ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

ठाणे - ठाणेमतदाता जागरण अभियान आयोजित नागरिकांच्या अभीरूप महासभेत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांच्या बदलीचा प्रस्ताव मांडला. तो तत्काळ महापौरांकडून स्विकारण्यात आला. परंतु आयुक्तांनी यावेळी निषेध नोंदवित सभात्याग केला.               ठाणे महानगरातील नागरिकांच्या समस्या जनतेसमोर मांडण्याकरता या अभिरूप महासभेचे आयोजन करण्यात आले होते. हे कोणतेही नाटक नव्हते तर प्रश्न मांडण्याची नवी पद्धत असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी मराठी ग्रंथ संग्रहालय येथे झालेल्या महासभेत विरोधीपक्ष नेत्यांनी हा प्रस्ताव मांडला.आयुक्तांची साडेतीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या संपूर्ण कारर्कीदीत त्यांनी अत्यंत धडाकेबाज कामे व प्रकल्प पूर्ण केले हे मान्य करावेच लागेल. त्यांनी सुरू केलेल्या प्रशासकीय सुधारणा व आणलेली गती ही आनंदाची बाब असली व सर्व साधारणपणे त्याचे कौतुक होत असले तरी प्रशासनातील वाढलेला भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहार ही देखील चिंताजनक बाब असल्याचे स्पष्ट केले. रस्ते दुरु स्ती व खड्डे बुजवणे ही त्याची उदाहरणे असल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रो केवळ बिल्डरांचे फ्लॅट विकण्यासाठी बांधली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. असे अनेक मुद्दे उपस्थित करीत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार नियमानुसार आयुक्तांची बदली करावी तसेच त्यांच्या साडे तीन वर्षाच्या कारभाराची चौकशी करावी असा प्रस्ताव त्यांनी सभागृहासमोर मांडला. या भाषणा दरम्यान वेळोवेळी सत्ताधारी पक्षांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु महापौरांनी मात्र त्यांना समज देऊन गप्प केले.                 सभागृह नेत्यांनी या प्रस्तावाला विरोध करताना आयुक्तांचे जोरदार समर्थन करण्याचा प्रयत्न केला. आयुक्तानीही आपली बाजू मांडली, ते म्हणाले,’’या सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रस्ताव चर्चेकरता मांडला आहे, तो आश्चर्यकारक व काहीसा राजकीय भूमिकेतून मांडला आहे. मी राज्य शासनाचा प्रतिनिधी असून याबाबत जे नियम, कायदे व प्रथा आहेत त्या मलाही लागू आहेत. त्यामुळे शासनाने माझी बदली केली तर ती मी नाकारू शकत नाही. तसेच तीन वर्षे पूर्ण झाली आता माझी बदली करा अशी मागणीही करू शकत नाही. याबाबत शासन जो निर्णय घेईल तो मला मान्य असेलच. पण माझी बदली करा असे सांगताना विरोधी पक्ष नेत्यांनी गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे जे आरोप केलेत ते मला पूर्णपणे अमान्य असल्याचे सांगितले. तसेच मी कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु त्यांनी विरोधी पक्षाने केलेल्या निवेदनाच्या विरोधाता निषेध नोंदवित सभात्याग केला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त