शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

मीरा भाईंदर पालिकेच्या २१ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती

By धीरज परब | Updated: December 24, 2022 13:40 IST

महानगरपालिकेच्या आकृतीबंध व सेवाशर्ती नियमात पदोन्नतीने लिपीक पद भरण्याचे प्रमाण २५ टक्के होते.

 मीरारोड -  मीरा भाईंदर महापालिकेच्या आस्थापने वरील चतुर्थ श्रेणीतील २१ कर्मचाऱ्यांना लीपीक टंकलेखक पदावर पदोन्नती मिळाल्याने अनेकवर्षां पासून पदोन्नतीच्या आहेत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे . 

महानगरपालिकेच्या आकृतीबंध व सेवाशर्ती नियमात पदोन्नतीने लिपीक पद भरण्याचे प्रमाण २५ टक्के होते. त्यामुळे मोठ्या संख्येने चतुर्थ श्रेणीतील पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्यात अडथळा निर्माण झाला होता . या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शासना कडे पत्रव्यवहार चालवला होता . शासनाने देखील  पदोन्नतीने पदे भरण्याचे प्रमाण २५ टक्के ऐवजी ४० टक्के इतके केले . 

शासनाची मंजुरी मिळाल्या नंतर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती साठी पदवी परीक्षा उत्तीर्ण , एमएस सीआयटी परीक्षा तसेच मराठी ३० व इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र सादर करण्यास ७ दिवसांची मुदत दिली होती .  

मजूर , सफाई कामगार , शिपाई , हेडमाळी , रखवालदार , मजूर , पंचमदतनीस आदी पदांवर असलेल्या २१ कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नतीचे पत्र आयुक्त ढोले यांच्या हस्ते देण्यात आले . यावेळी [पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आयुक्त ढोले व उपायुक्त मुख्यालय मारुती गायकवाड यांचे आभार मानले . शहरातील नागरिकांची कामे वेळेत व तत्परतेने करा असे आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.