शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बंदींच्या कला कौशल्याला प्रोत्साहन द्या; जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचं आवाहन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 20, 2022 17:13 IST

ठाणे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांद्वारे अनेक गृहपोयोगी वस्तूंच्या निर्मितीचा उदयोग गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.

ठाणे: बंदीवानांच्या अंगभूत कलागुण, कौशल्य तसेच त्यांच्या आवडीनिवडी जोपासत त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तू विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरीकांनी प्रोत्साहन दिल्यास भविष्यात शिक्षा संपवून परतल्यावर एकप्रकारे त्यांच्या पुर्नवसनाला मदत होईल. त्यामुळे त्यांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन द्या असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. 

ठाणे मध्यवर्ती कारागृहात दीपावली सणानिमित्त बंदींनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री सुरू असून या अनोख्या कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन गुरुवारी जिल्हाधिकारी  शिनगारे आणि कारागृह उपमहासंचालक योगेश देसाई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कारागृहाचे प्रभारी अधीक्षक भाईदास ढोले व तुरुंगाधिकारी उपस्थित होते. ठाणे कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कौशल्यवान हातांनी बनविलेल्या विविध गृहपयोगी वस्तू दिवाळीनिमित्त ठाणे कारागृहाबाहेरच्या विक्री केंद्रात ठेवण्यात आल्या आहेत.

उद्घाटनप्रसंगी शिनगारे म्हणाले की, कुणीही जन्मतः गुन्हेगार नसतो. एखादी परिस्थिती अथवा अपप्रवृत्ती त्याला गुन्हेगार बनवते. ठाणे मध्यवर्ती कारागृहात अनेक बंदिवान शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या अंगभूत कलाकौशल्याला नागरीकांनी प्रोत्साहन द्यावे. कारागृह उपसंचालक देसाई यांनीही आपल्या कारकिर्दीत सुरु झालेल्या या उपक्रमाची स्तुती केली.

ठाणे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांद्वारे अनेक गृहपोयोगी वस्तूंच्या निर्मितीचा उदयोग गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. यात शोपीस वस्तू, कपडे, बेकरी उत्पादन, फर्निचर वस्तू, गृहोपयोगी व शोभेच्या वस्तू आहेत. तसेच, दिवाळी सणासाठी खाद्यपदार्थ विशेष करुन दिवाळीचा फराळ, गृहपयोगी वस्तू, लाकडी खुर्च्या, चौरंग, देव्हारा, विविध प्रकारांच्या खुर्च्या, स्टँड, टॉवेल, शर्ट, लेडीज पर्स अशा विविध वस्तूचा समावेश आहे. या वस्तूंची विक्री व्हावी यासाठी ठाणे कारागृह प्रशासनाने हे वस्तू प्रदर्शन ठेवले आहे. कोर्ट नाक्यानजीक असलेल्या प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयासमोरील ठाणे कारागृहात दिवाळी संपेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका