शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील शिरीष पै काव्यकट्टयावर रंगला स्वरचित काव्य वाचनाचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 16:53 IST

ठाण्यात आयोजित करण्यात आलेला शिरीष पै काव्यकट्टा रविवारी सायंकाळी पार पडला. यावेळी ठाणे, मुंबई परिसरातील नवे - जुने कवी उपस्थित झाले होते.

ठळक मुद्दे शिरीष पै काव्यकट्टयावर रंगला स्वरचित काव्य वाचनडॉ. र. म. शेजवलकर प्रमुख पाहुणे म्हणून होते उपस्थितउद्वेली बुक्स निर्मित दोन काव्यसंग्रह झाले प्रकाशित

ठाणे : शिरीष पै काव्यकट्टा, ठाणेच्यावतीने रविवारी सायंकाळी विश्रांती बंगला येथे स्वरचित काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. र. म. शेजवलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित कवींना मार्गदर्शन करीत आपल्या कविता सादर केल्या.     कार्यक्रमादरम्यान उद्वेली बुक्स निर्मित दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. यात सना पंडित लिखीत समर्र्पण व अपर्णा मोहिले लिखीत शब्दपुष्पांजलीचे प्रकाशन डॉ. शेजवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी तू आणि मी, बॅलेन्स, राक्षस, बहावा, मराठी भूमिचा कणा, वादळ शेतकऱ्यांचे अशा मराठी - इंग्रजी कवितांचे सादरीकरण यावेळी केले. विवेक मेहेत्रे यांनी आपल्या ‘पाणी पावसात साचलेले...’, ‘पुर्वी कागदास सोप्या घड्या...’, ‘पावसास ये सांगणारे...’, ‘रेन रेन गो अवे....’ या चार चारोळ््या सादर केल्या. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांची भरभरुन दाद मिळाली. जे कवी कागद पाहून कविता वाचतात त्यांच्या त्या कविता उपस्थितांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कागद बाजूला ठेवून वाचावी आणि शक्यतो कविता पाठ करावी जेणे करुन ती थेट रसिकांपर्यंत पोहोचत असते असा सल्ला डॉ. शेजवलकर यांनी उपस्थित कवींना दिला. यावेळी त्यांनी आपण कसे आहोत हे सांगणारी ‘आम्ही’ तर दुसरी रुपकात्मक कविता सादर केली. उपस्थितांमधून त्यांच्या कवितांना वाहवाची दाद मिळत होती. डॉ. सुधीर मोंडकर यांनी कार्यक्रमाच्या निवेदनाची धूरा सांभाळत अत्रेंच्या काही आठवणी उलगडल्या. तसेच, त्यांनी आपली ‘लिलाव’ ही कविता सादर केली. यावेळी ठाणे, मुलुंड, घाटकोपर, अंबरनाथ, टिटवाळा यांठिकाणांहून आलेल्या कवींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई