शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

मराठी रंगभूमीचा प्रेक्षक प्रगल्भ, डा. गिरीश ओक यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 15:31 IST

बाळासाहेब स्वत: उत्तम कलावंत होते. कलांवर, कलाकारांवर त्यांचे प्रेम होते. अनेक कलाकारांच्या अडचणीच्या वेळी ते ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यामुळे त्यांच्या नावाची ही स्पर्धा आयोजित करणे, हा आमचा बहुमान असल्याची भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत मिथक, मुंबई या संस्थेची ‘बेनिफिट आॅफ डाउट’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. याच एकांकिकेसाठी ओंकार राऊतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर ‘रंगबावरी’साठी कांचन माळी हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.

ठळक मुद्देसर्वोत्कृष्ठ एकांकिकेस एक लाखांचे पारितोषीकद्वितीय क्रमांकास ७५ हजारांचे पारितोषीक

ठाणे - प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीचे अंतर कमी झाले आहे. दादरला व्यावसायिकचे शिवाजी मंदिर आणि प्रायोगिकचे छबिलदास केवळ एक गल्ली सोडून आहेत, पण तरीही रंगकर्मींना छबिलदासहून शिवाजी मंदिरपर्यंत पोहोचायला वेळ लागायचा. हल्ली मात्र पूर्वी केवळ प्रायोगिकवरच बघायला मिळू शकणारी नाटके थेट व्यावसायिक रंगभूमीवर येत आहेत. याचा अर्थ आपले नाटक प्रगल्भ झाले आहे आणि आपला प्रेक्षक प्रगल्भ झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी मंगळवारी येथे केले.                 ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी रात्री गडकरी रंगायतन येथे पार पडला. त्याप्रसंगी डॉ. ओक बोलत होते. या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ओक यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते उपस्थित होत्या. उदय सबनिस, अभिजीत खांडकेकर, अनिता दाते, भारती पाटील यांची विशेष उपस्थिती होती. अंतिम फेरीचे प्रशिक्षक या नात्याने ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, नव्या पिढीचा दिग्दर्शक-अभिनेता अद्वैत दादरकर, विनायक दिवेकर, हर्षदा बोरकर आणि सुरेश मगरकर उपस्थित होते. याखेरीज पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते दिलीप बारटक्के, टॅगचे अध्यक्ष अशोक नारकर आदी मान्यवर उपस्थित होते.               स्वा. सावरकर प्रतिष्ठान, जनसेवा प्रतिष्ठान, ठाणे आर्ट गिल्ड आणि शिवसेना चित्रपट सेना यांच्या सहआयोजनातून पार पडलेल्या या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मिथक, मुंबई या संस्थेची ‘बेनिफिट आॅफ डाउट’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. याच एकांकिकेसाठी ओंकार राऊतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर ‘रंगबावरी’साठी कांचन माळी हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. रंगबावरी (सेंट गोंसालो गार्सिया महाविद्यालय, वसई) आणि एका दशावतार (रु ईया महाविद्यालय, मुंबई) या एकांकिकांनी अनुक्र मे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक पटकावले. एका दशावतारसाठी प्राजक्त देशमुखने सर्वोत्कृष्ट लेखक आणि रणजीत पाटीलने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. आमचे आम्हीच, पुणे या संस्थेची ‘आय अ‍ॅग्री’ ही लक्षवेधी एकांकिका ठरली. प्रथम क्र मांकाच्या एकांकिकेस १ लाख आणि स्मृतीचिन्ह, द्वितीय क्र मांकास ७५ हजार आणि स्मृतीचिन्ह व तृतीय क्र मांकास ५१ हजार व स्मृतिचिन्ह, लक्षवेधी एकांकिकेस ११ हजार व स्मृतिचिन्ह, सर्वोकृष्ट अभिनेता व अभिनेत्रीसाठी प्रथम ११ हजार, द्वितीय ५ हजार, सर्वोकृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट लेखक ११ हजार व स्मृतिचिन्ह, सर्वोकृष्ट प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा अशा सर्वच विभागांसाठी प्रत्येकी ५ हजार व स्मृतिचिन्ह असे पुरस्कार देण्यात आले.याप्रसंगी उपस्थित तरु ण रंगकर्मींना मार्गदर्शन करताना वंदना गुप्ते म्हणाल्या की, मराठी भाषेवर प्रेम करा, तुमच्या हातून आपसूक चांगली नाटके होतील. तरुण रंगकर्मींसाठी कार्यशाळा वगैरे आयोजित केली तरी मी नक्की येईन, असेही त्या म्हणाल्या. बाळासाहेबांच्या नावे ही स्पर्धा होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. कलेवर, कलाकारांवर बाळासाहेबांचे प्रेम होते. त्यांना अगदी लहानपणापासून जवळून बघण्याची संधी मिळाली, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना