मुंब्य्रात ६४० स्टॉलसह ४५ गाळ्यांवर बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:29 AM2019-01-23T00:29:50+5:302019-01-23T00:30:01+5:30

मागील काही दिवस मुंब्रा भागात सुरू असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईचा वेग आता वाढला आहे.

Bulldozer on 45 floors with 640 stalls in Mumbra | मुंब्य्रात ६४० स्टॉलसह ४५ गाळ्यांवर बुलडोझर

मुंब्य्रात ६४० स्टॉलसह ४५ गाळ्यांवर बुलडोझर

Next

ठाणे/मुंब्रा : मागील काही दिवस मुंब्रा भागात सुरू असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईचा वेग आता वाढला आहे. मंगळवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे स्वत: कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. त्यानुसार सात पथकांनी तेथील गुलाब मार्केटसह जवळपास ६४० स्टॉल्स आणि ४५ व्यावसायिक गाळे बुलडोझरने जमीनदोस्त केले.
मंगळवारी सकाळी मुंब्रा रेल्वे स्टेशन ते वाय जंक्शनपर्यंत दोन्ही बाजूंनी ही कारवाई करण्यात आली. यासाठी सर्व उपायुक्तांच्या अधिपत्याखाली सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांचा समावेश असलेली सात विविध पथके तयार केली होती. या पथकांच्या साहाय्याने सकाळी मुंब्रा रेल्वे स्टेशनपासून कारवाईला सुरुवात झाली. यामध्ये संपूर्ण गुलाब मार्केट जमीनदोस्त करण्याबरोबरच रस्त्यांवरील एकूण ६४० स्टॉल्स बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्याचबरोबर एमएम व्हॅली, अमृतनगर, बॉम्बे कॉलनी या परिसरातील कारवाईत ४५ व्यावसायिक गाळे तोडण्यात आले.
उपायुक्त (अतिक्र मण व निष्कासन) अशोक बुरपल्ले यांच्या समन्वयातून उपायुक्त संदीप माळवी, मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त महादेव जगताप, शंकर पाटोळे, महेश आहेर यांच्या पथकांनी ही कारवाई ८ जेसीबी, १० डंपर आणि जवळपास २०० कामगारांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण केली.

Web Title: Bulldozer on 45 floors with 640 stalls in Mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.