शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यात कच-यापासून होतेय १८,५९२ मेट्रीक टन खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:19 IST

स्वच्छ भारत अभियान २०१८ च्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्राने उल्लेखनिय कामगिरी केली असून ९ जानेवारी २०१८ पर्यंत २५६ शहरे हागणदारी मुक्त झाले आहेत. याशिवाय राज्यातील विविध शहरांतील दैनंदिन कच-यापासून १८ हजार ५९२.२ मेट्रीक टन सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात येत आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्याचा सिंहाचा वाटा आहे.

- नारायण जाधवठाणे : स्वच्छ भारत अभियान २०१८ च्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्राने उल्लेखनिय कामगिरी केली असून ९ जानेवारी २०१८ पर्यंत २५६ शहरे हागणदारी मुक्त झाले आहेत. याशिवाय राज्यातील विविध शहरांतील दैनंदिन कच-यापासून १८ हजार ५९२.२ मेट्रीक टन सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात येत आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्याचा सिंहाचा वाटा आहे.यादीत गेल्या वर्षीच्या २०१७ च्या सर्व्हेक्षणात नवी मुंबईने देशात आठवा तर राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता. मात्र, यंदा नवी मुंबईसह पुणे, ठाणे, मुंबई, पिंपरी चिंचवडमध्ये चुरस असल्याचे सांगण्यात येत आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनच्या संकेतस्थळानुसार देशभरात या काळात ४० लाख ८४ हजार ६२० वैयक्तिक शौचालयांचे उद्दीष्ट गाठण्यात आले असून त्यात महाराष्ट्राचा वाटा पाच लाख ९६ हजार १७९ शौचालयांचा आहे. याशिवाय देशभरात दोन लाख ३४ हजार १६१ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून राज्यात ही संख्या ८९ हजार ५२५ इतकी आहे.देशभरातील विविध शहरांतील ५१ हजार ७३४ वॉर्डात डोअर टू डोअर कचºयाचे संकलन होत असून राज्यातील अशा वार्डांची संख्या ४३०० इतकी आहे. याशिवाय देशभरात एक लाख ६४ हजार ८९१.६ मेट्रीक टन कचºयापासून सेंद्रीय खताची निर्मिती होत असून त्यात राज्याचा वाटा १८ हजार ५९२.२ मेट्रीक टन इतका आहे. ठाणे महापालिका १५० मेट्रीन टन, नवी मुंबई महापालिका ६० मेट्रीन खत निर्मिती करते. शिवाय नवी मुंबई महापालिका प्लास्टिक दाण्यांची निर्मिती करीत असून त्यांचा वापर रस्ते बांधणी करीत आहे.2018च्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्राने उल्लेखनिय कामगिरी केली असून ९ जानेवारी २०१८ पर्यंत २५६ शहरे हागणदारी मुक्त झाले.18,592मेट्रीक टन सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात येत आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्याचा सिंहाचा वाटा आहे.1494शहरांत स्वच्छ सर्व्हेक्षण- १८ सुरू असून यात देशात पहिल्या दहा स्वच्छ शहरांच्या यादीत येण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.

टॅग्स :thaneठाणे