शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणाची कारवाई दोन दिवसात सुरु होणार, आयुक्तांनी दिले संबधींत विभागाला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 18:09 IST

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा एकदा रस्ता रुंदीकरणाची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये ८०० रहिवास व ३३८ वाणिज्य बांधकामे पाडली जाणार आहेत.

ठळक मुद्देबैठकीत दिले आयुक्तांनी आदेश८०० रहिवास आणि ३३८ वाणिज्य बांधकामांवर पडणार हातोडा

ठाणे - मागील सरत्या वर्षात थांबलेली रस्ता रुंदीकरणाची कारवाई ठाणे महापालिकेने नव्या वर्षात पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील डीपी रोड अंमलबजावणी करणे तसेच रस्ता रुंदीकरणातंर्गत बाधित बांधकामांवर दोन दिवसात कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी दिले.                मागील दोन वर्षात ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण केले. यामध्ये पोखरण रोड नं. २, तीन आदींसह स्टेशन परिसर, शास्त्री नगर ते हत्तीपुल, मुंब्रा, कळवा, घोडबंदर आदी भागात रस्त रुंदीकरणाची कारवाई मोठ्या जोमाने करण्यात आली. या कारवाईला कुठेही विरोध झाला नाही. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या या कामाचे कौतुक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा केले होते. त्यानंतर मागील काही महिने थांबलेली रस्ता रुंदीकरणाची कारवाई आता पुन्हा एकदा नव्या वर्षात सुरु करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आयुक्तांनी यासंदर्भात आढावा घेवून विकास योजनेतंर्गत रस्ते आणि ज्या ठिकाणी रस्ते रूंदीकरणाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी दोन दिवसांत कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे तसेच महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.                    या बैठकीत आयुक्तांनी शहरातील सर्व रस्ते रु ंद मोकळे करण्यासाठी त्यामध्ये बाधीत सर्व बांधकामावर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. या कारवाई अंतर्गत एम एम व्हॅली ते कल्याण रोड, कल्याण फाटा दत्त मंदिराच्या पाठीमागील रस्ता, तावशी रस्ता, दिवा आगासन जंक्शन ते दिवा स्टेशन, वाघबीळ रस्ता, नामदेववाडी टी.पी.स्कीम रस्ता, रस्ता क्र . ३३ वागळे इस्टेट कामगार हॉस्पिटल, रस्ता व रस्ता क्र .१६ या रस्त्यावरील एकूण ८०० रहिवास व ३३८ वाणिज्य बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणेcommissionerआयुक्त