शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रोबेस स्फोट आरडीएक्स क्षमतेचा

By admin | Updated: April 25, 2017 00:11 IST

एमआयडीसीमधील प्रोबेस कंपनीत ११ महिन्यांपूर्वी झालेला भीषण स्फोट आरडीएक्स स्फोटाइतका तीव्र क्षमतेचा होता. अत्यंत ज्वलनशील

मुरलीधर भवार / डोंबिवलीएमआयडीसीमधील प्रोबेस कंपनीत ११ महिन्यांपूर्वी झालेला भीषण स्फोट आरडीएक्स स्फोटाइतका तीव्र क्षमतेचा होता. अत्यंत ज्वलनशील प्रोपार्जिल क्लोराइड या रसायनाचा तीन टन साठा कंपनीत होता व वेल्डिंगची ठिणगी पडल्याने रसायनाने पेट घेतल्याने स्फोट झाला. एक किलो प्रोपार्जिल क्लोराइडच्या स्फोटाची तीव्रता अर्धा किलो आरडीएक्स स्फोटाइतकी असते. भविष्यात दहशतवाद्यांकडून या रसायनाचा घातपाताकरिता वापर केला जाऊ शकतो, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. डोंबिवलीतील रहिवासी राजू नलावडे यांनी माहितीच्या अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे स्फोटाच्या चौकशी समितीचा अहवाल मागितला होता. दोन महिन्यांनी नलावडे यांना पाठवलेल्या पत्रात अहवाल अद्याप तयार झालेला नाही. मात्र, अहवाल तयार करण्यासाठी समितीच्या झालेल्या बैठकांचे इतिवृत्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले. त्यामध्ये वरील धक्कादायक माहिती उघड झाली आहे. २६ मे २०१७ रोजी स्फोटाच्या घटनेला वर्ष पूर्ण होणार आहे. कंपनीत पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. वेल्डिंगचे काम सुरू असताना कंपनीत साठवलेल्या प्रोपार्जिल क्लोराइडवरठिणगीपडल्याने स्फोट झाला. कंपनीत रसायनाचा तीन टन इतका साठा होता. प्रोेपार्जिल रसायन हे ११० डिग्री सेल्सिअसला एक हजार ज्युल्स प्रतिग्रॅम इतकी ऊर्जा उत्पन्न करते. त्याच्या शॉकवेव्हज निर्माण होऊन त्या सर्व दिशांना पसरतात. या रसायनामध्ये उच्च स्फोटकीय क्षमता आहे. कारखान्यातील रसायनाच्या वापरावर व साठवणुकीवर कोणत्याही सरकारी विभागाचे नियंत्रण नाही. त्यामुळे भविष्यात या रसायनाचा दहशतवाद्यांकडून वापर केला जाऊ शकतो, असे मत पोलिसांनी बैठकांत व्यक्त केले आहे. प्रोबेस कंपनीत प्रोपार्जिल अल्कोहोल व थायोनील या रसायनांची प्रक्रिया करून प्रोपार्जिल क्लोराइड तयार केले जात होते. हे उत्पादन या कारखान्यात १९८७ पासून सुरू होते. भारतामध्ये प्रोपार्जिल क्लोराइटचे उत्पादन करण्यास सर्वात प्रथम प्रोबेस कंपनीला परवानगी दिली होती. सध्या गुजरातमधील बडोदा येथील ट्रान्सपेक कंपनीत प्रोपार्जिल क्लोराइडचे उत्पादन घेतले जाते. प्रोबेस कंपनी या रसायनाचे उत्पादन करून फ्रान्समधील कंपन्यांना पुरवत होती. २०१६ मध्ये कारखान्याने या रसायनाचे ४९९० टन उत्पादन करून गुजरातमधील अंकलेश्वर येथे पुरवले होते. स्फोटाच्या दिवशी कंपनीत या रसायनाचे २०० लीटर क्षमतेचे २० ते २२ ड्रम साठवून ठेवले होते. साठवलेले रसायन ९९ टक्के शुद्ध होते. रसायन शुद्ध प्रतीचे असल्याने स्फोटाची तीव्रता अधिक वाढली.प्रोबेस कंपनीच्या बाजूला हर्बर्ट ब्राउन लॅबोरेटरीज या कंपनीत एन-बुथली लिथिअमचा सिलिंडर सापडला. हा पदार्थ फारच हानीकारक आहे. त्याचा स्फोट झाल्यास फार मोठे नुकसान होऊ शकते. त्याची माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालकांनी घ्यावी, असे पोलीस उपायुक्तांनी सुचवले. प्रोबेस स्फोटाबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, तर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण विभागाने ठाणे न्यायालयात चार फौजदारी खटले दाखल केले आहेत.