शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीच्या पाणीबिल वसुलीचे खासगीकरण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 03:24 IST

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने दरवर्षी पाणीबिलाच्या वसुलीत किमान २० कोटींची घट होते आहे.

मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने दरवर्षी पाणीबिलाच्या वसुलीत किमान २० कोटीची घट होते आहे. जर अपेक्षेप्रमाणे ७५ कोटीची वसुली व्हायला हवी असेल तर पाणीबिलाच्या वसुलीचे खासगीकरण करायला हवे, असा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे. त्यावर निर्णय झाला की निविदा मागविली जाणार आहे.महापालिका पिण्यासाठी उल्हास व काळू नदी पात्रातून पाणी उचलले जाते. एमआयडीसी व महापालिका मिळून दररोज ३४५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जाता. त्यापैकी २७ गावांना एमआयडीसीकडून दररोज ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. या पाणीबिलापोटी महिन्याला एक कोटी रुपयांचे बिल महापालिका एमआयडीसीला भरते. ३४५ दशलक्ष पाणीपुरवठा केल्यानंतर बिलापोटी वर्षाला ७५ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. २०१५ मध्ये पाणीबिलाची वसुली ४९ कोटी ३९ लाख, २०१६ मध्ये ५७ कोटी २१ लाख आणि २०१७ मध्ये आॅक्टोबरअखेरपर्यंत ५५ कोटी ४२ लाख मिळाले.पाणीपुरवठा विभागात अधिक्षक, लिपीक, शिपाई व कामगार मिळून १७८ कर्मचारी आवश्यक आहेत. पण सध्या ११५ कर्मचारी आहेत. सध्याच्या कर्मचारी वर्गावर वेतनापोटी महापालिकेला वर्षाला पाच कोटी रुपये खर्च करावे लागतात. दरवर्षी सरसरी ५३ कोटी ४७ लाखांची वसुली धरल्यास त्यात दहा टक्के नैसर्गिक वाढ धरुन २०१८ सालासाठी ६० कोटीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. खाजगी कंत्राटदाराला ६० कोटीचे टार्गेट देऊन त्याच्याकडून दरमहा पाच कोटी वसूल होणे अपेक्षित राहिल. हे काम सुरुवातीला दोन वर्षासाठी दिले जाईल. याशिवाय कंत्राटदाराला महिन्याला २५ लाखाचा सेवाकर द्यावा लागेल. जलमापकाचे वाचन करणे, वाचन संगणकात नोंदविणे, पाणी बिल तयार करणे, त्याचे वितरण करणे, त्याच्या वसुलीसाठी पाठपुरावा करणे, बिल न देणाºयाचा पाणीपुरवठा खंडीत करणे, त्याने बिल भरल्यावर तो पुन्हा जोडणे, बेकायदा नळ जोडण्यांचा पुरवठा खंडित करणे, जलमापकांची दुरुस्ती आणि देखभाल त्यालाच करावी लागणार आहे.> २० हजार बेकायदा जोडण्या : महापालिकेच्या दप्तरी एक लाख ३६ हजार पाणीग्राहक आहेत. तर बेकायदा नळ जोडण्यांची संख्या २० हजार आहे. पालिकेने कोलब्रो कंपनीला मालमत्ता सर्वेक्षणाचे काम दिले आहे. त्यात पाणी- नळजोडण्या किती बेकायदा आहेत, याचेही सर्वेक्षण करायचे आहे. आतापर्यंत तीन हजार बेकायदा नळ जोडण्यांचा प्राथमिक अहवाल कोलब्रोकडून आला आहे. पालिका पाणीपुरवठ्याच्या देखभाल- दुरुस्तीवर सात कोटींचा खर्च दरवर्षाला करते. पाणी पुरवठा योजना, सम पंप यांच्यासाठी लागणारी वीज व त्याचे बिल वर्षाला ३० कोटींच्या घरात आहे. बिल कमी करण्यासाठी पालिकेने एनर्जी आॅडिट हाती घेतले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका