शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरोधातील लढाईत खासगी डॉक्टरांना विमाकवच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 10:27 IST

इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे खासगी डॉक्टरांनाही ५० लाखांच्या विम्याचे कवच मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, डॉक्टरांच्या कुटुंबाला ५० लाखांपर्यंत विमा देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मात्र, राज्य सरकार या डॉक्टरांना विमा नाकारत असल्याने इंडियन मेडिकल असोसिएशन व खासगी डॉक्टर्स संघटनांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

ठाणे : कोरोनाविरोधातील लढाईत सरकारी डॉक्टरांच्या बरोबरीने खासगी डॉक्टर कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावताना अनेक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे खासगी डॉक्टरांनाही ५० लाखांच्या विम्याचे कवच मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, डॉक्टरांच्या कुटुंबाला ५० लाखांपर्यंत विमा देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मात्र, राज्य सरकार या डॉक्टरांना विमा नाकारत असल्याने इंडियन मेडिकल असोसिएशन व खासगी डॉक्टर्स संघटनांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

 राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘आयएमए’च्या अनेक डॉक्टरांनी पुढाकार घेऊन उपचार करण्यास सुरुवात केली. मात्र, विमा तरतुदीत इतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांचा उल्लेख नसल्याचे असोसिएशनने राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल घेत आरोग्य विभागाने सर्व खासगी डॉक्टरांना ही विमा योजना लागू असल्याचे परिपत्रक सर्व जिल्ह्यांना पाठवले. मात्र, प्रत्यक्षात  अर्ज केल्यानंतर कोरोना रुग्णालयात सेवा न दिल्याचे कारण देत ते फेटाळले. कोरोनामुळे मृत्यू झालेले आयएमएचे सदस्य डॉक्टर कोरोनाकाळात रुग्णसेवा देत होते का, याची खात्री करून तसे मान्यतापत्र या विम्याच्या अर्जात जोडले होते. 

पाच ते सहा महिन्यांपासून खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावत आहेत. ही सेवा बजावत असताना अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण होऊ न त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यात मृत डॉक्टरांचे विम्यासाठी अर्ज केले असता त्यांनी शासकीय रुग्णालयात सेवा बजावली नसल्याचे कारण देत विमा सुरक्षा नाकारण्यात येत आहे. हे चुकीचे असून सर्वच क्षेत्रांतील डॉक्टरांना विमा संरक्षण देणे गरजेचे आहे.     - डॉ. संतोष कदम, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे  

टॅग्स :docterडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे