शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

कारागृहाला सव्वा कोटी उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:30 IST

ठाणे मध्यवर्ती कारागृहात केवळ ६० बंदींनी वर्षभरात सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग यासारख्या विविध कामांतून तब्बल एक कोटीहून अधिक उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहात केवळ ६० बंदींनी वर्षभरात सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग यासारख्या विविध कामांतून तब्बल एक कोटीहून अधिक उत्पन्न मिळवून किमया घडवली आहे. गतवर्षीपेक्षा हे उत्पन्न अधिक आहे. यंदा सुतारकाम आणि त्यानंतर बेकरी-फरसाणमधून सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे. बंदींच्या हाताला काम देऊन त्यांच्यातील कलाकौशल्य विकसित व्हावे आणि बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या पायावर उभे राहावे, या उद्देशाने ठाणे मध्यवर्ती विभागात कारखाना विभाग सुरू आहे. यात सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी, फरसाण आदी कामे सुरू असतात. बेड्स, डायनिंग टेबल, देव्हारे, कपडे शिवणे, ओट्स, बिस्किट्स, फरसाण, कापड बनवणे यासारख्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ या कारखाना विभागात बंदी बनवत असतात. २०१६-१७ या आर्थिक वर्षात केवळ ६० बंदींनी मिळून १ कोटी ३३ लाख, ६० हजार ३४२ इतके उत्पन्न मिळवून दिले. गतवर्षीच्या उत्पन्नाचा आकडा १ कोटी २५ लाख ८ हजार ९४२ इतका होता. यंदा त्यात ८ लाख, ५१ हजार ४०० ने वाढ झाली आहे. सुतारकामातून ४६ लाख २४ हजार १८, शिवणकामातून ३१ लाख ५३ हजार १०५, धोबीकामातून १ लाख ९२ हजार ४५५, यंत्रमागातून १९ लाख तीन हजार १९७, बेकरी-फरसाणमधून ३४ लाख ८७ हजार ५६७ इतके यंदा उत्पन्न मिळाले आहे. सुतारकाम आणि बेकरी-फरसाणमधून जास्त उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न डिसेंबर २०१६ मध्ये मिळाले आहे. कारखाना विभागातून दरवर्षी सुतारकामातून तयार केलेल्या वस्तूंना आणि खाद्यपदार्थांना जास्त मागणी असल्याने या दोन विभागांतून कारागृहाला जास्त उत्पन्न मिळते. बंदींनी तयार केलेल्या हाय बॅग आॅफिशियल चेअरला शासकीय अधिकाऱ्यांची अधिक पसंती आहे. कारागृहाच्या बाहेर शोरूममध्ये या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. गतवर्षीपेक्षा शिवणकाम आणि यंत्रमागातील उत्पन्नात यंदा वाढ झाली आहे. बंदी या कामात तरबेज झाले, तर शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यावर काम मिळवताना त्यांना कोणती अडचण येणार नाही. त्यामुळे बंदी खूप मन लावून काम करतात, असे कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांनी लोकमतला सांगितले.