शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

घरचे जेवण न दिल्याने कैद्याने घेतला पोलिसाच्या हाताचा चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 04:29 IST

न्यायबंदी कैद्याने ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई महेश ठाकूर याच्या हाताचा चावा घेतल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ठाण्यात घडली.

ठाणे : न्यायालयात आणलेले घरचे जेवण न दिल्याचा राग मनात धरून मोहम्मद सोहल शौकतअली मन्सुरी (२६ रा. नळबाजार, मुंबई) या न्यायबंदी कैद्याने ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई महेश ठाकूर याच्या हाताचा चावा घेतल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ठाण्यात घडली. तसेच ठाकूर यांच्यासह पोलीस शिपाई विवेक काळे यांना त्याने शिवीगाळ करून धक्काबुकी केली.हा प्रकार दिंडोशी न्यायालयातून पुन्हा: ठाणे मध्यवर्ती कारागृहात नेताना नौपाडा परिसरात घडला. या प्रकरणी मन्सुरी याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कदम यांनी दिलेल्या तक्रारीत, त्यांची शुक्रवारी ठाणे मध्यवर्ती कारागृह ते दिंडोशी न्यायालय अशी ड्युटी होती. ते १२ कर्मचाऱ्यांसह गाडीने ठाणे कारागृहातून १२ कैद्यांना घेऊन दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दिडोंशी न्यायालयात हजर केले.हजर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व न्यायबंदी व पोलीस कैदी पार्टी असे १४ जण या गाडीमध्ये बसून कारागृहात निघाले. न्यायबंदी मोहम्मद मन्सुरी याची महिला नातेवाईक जेवणाचा डब्बा घेवून आली होती. तिने डबा मन्सुरीला देण्यास सांगितले. मात्र, त्याला घरचे जेवण देवू शकत नाही, असे पोलिसानी सांगितल्यावर त्याचा राग येऊन मन्सुरी याने कदम यांच्याशी हुज्जत घातली.>शिवीगाळ करून धक्काबुकीगाडी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे येताना हरीनिवास सर्कल ते तीन पेट्रोलपंपच्या दरम्यान मन्सुरी याने पोलीस शिपाई ठाकूर आणि काळे यांना शिवीगाळ करून धक्काबुकी केली. तसेच ठाकूर यांच्या उजव्या हाताच्या करंगळी जवळ चावा घेऊन त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मन्सुरी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.