शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
3
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
4
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
5
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
6
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
7
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
8
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
9
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
10
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
11
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
12
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
13
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
14
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
15
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
16
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
17
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
18
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
19
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
20
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर

सर्वेक्षणाअभावी रखडली ‘पंतप्रधान आवास’

By admin | Updated: February 26, 2017 02:30 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ६५० पेक्षा जास्त धोकादायक इमारती आहेत. या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन ‘क्लस्टर योजना’ आणि ‘पंतप्रधान आवास योजने’

- मुरलीधर भवार,  कल्याण

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ६५० पेक्षा जास्त धोकादायक इमारती आहेत. या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन ‘क्लस्टर योजना’ आणि ‘पंतप्रधान आवास योजने’ अंतर्गत करण्यात येणार आहे. मात्र, पंतप्रधान आवास योजना राबवण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी महापालिकेस कंत्राटदारच मिळत नसल्याने ते रखडले आहे. धोकादायक इमारतींमधील काहींना पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करता आलेले नाही. त्यामुळे या योजनेसाठी तातडीने कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करून सर्वेक्षण सुरू करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) केली आहे. या प्रश्नी भाकपाचे अरुण वेळासकर, महेश साळूंके आणि सुनील नायक यांनी नुकतीच महापौर राजेंद्र देवळेकर व सभागृह नेते राजेश मोरे यांची भेट घेतली. सर्वेक्षण करण्याचा विषयी तातडीने एक ठराव महासभेत मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. धोकादायक इमारतींच्या प्रश्नी महापालिका प्रश्नासनाकडून दिरंगाई व चालढकल करण्याचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दुसरीकडे सर्वेक्षणासाठी दत्तनगरातील रहिवाशांनी मोरे यांच्या कार्यालयावर अलीकडेच धडक दिली होती. पावसाळ््यात महापालिका धोकादायक इमारतींच्या प्रश्नी जागी होते. त्यानंतर पुन्हा तो बासनात बांधून ठेवला जातो. पावसाळ््यापूर्वी त्यासाठी प्रयत्न होत नाहीत. आता पावसाळा तीन महिन्यांवर आहे. त्याआधीच हालचाली आवश्यक आहेत, असे भाकपने म्हटले आहे. एखादी धोकादायक इमारत कोसळल्यावर विकासक वर्षभरात भोडकरूंना ती विकसित करून देत नसल्यास ती विकसित करण्याचा अधिकार भाडेकरूंना मिळावा, हा धोरणात्मक निर्णयही महापालिकेने घेऊन तो सरकार दरबारी पाठवला पाहिजे, अशी आग्रही मागणी भाकपने केली आहे.बीएसयूपी योजनेत सहभागी करून घेण्याची मागणी डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. त्यावर न्यायालयाने राजीव गांधी आवास योजने अंतर्गत सर्वेक्षण करावे, असे म्हटले होते. २०१४ मध्ये केंद्रात भाजपा सरकार आले. या सरकारने राजीव गांधी आवास योजना रद्द होऊन पंतप्रधान आवास योजना लागू केली. या योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत देश झोपडीमुक्त करण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोळ््यासमोर ठेवले आहे. जुलै २०१५ मध्ये ठाकुर्ली येथील ‘मातृछाया’ ही धोकादायक इमारत कोसळून त्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी सरकारने तातडीने योजना जाहीर करावी, या मागणीसाठी सुनील नायक यांनी उच्च न्यायालयात २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीच होत नसल्याने त्यांनी याचा पाठपुरावा सुरूच ठेवला. दीड महिन्यापूर्वी न्यायालयाने याचिकेचे कागदपत्र गहाळ झाल्याचे सांगितले, असे नायक म्हणाले. कागदपत्रे गाहळ झाल्याने ती पुन्हा नव्याने सादर केली. येत्या महिन्यात त्याच्या सुनावणीची तारीख मिळावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘क्लस्टर’चा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोटही रखडलापंतप्रधान आवास योजनेसाठीच्या सर्वेक्षणासाठी कंत्राटदार मिळत नसला तरी महापालिकेने धोकादायक इमारतींच्या विकासासाठी क्लस्टर योजना राबवण्याचे ठरवले आहे. योजना राबवण्यासाठी इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेने आॅगस्ट २०१६ मध्ये केला आहे. हा अहवाल दोन महिन्यांत तयार केला जाईल. तो सरकार दरबारी पाठवला जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, सहा महिने उलटूनही तो अद्याप तयार झालेला नाही. महापौर राजेंद्र देवळेकर यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, हा अहवाल जवळपास तयार होत आला आहे. तो मार्चच्या महासभेसमोर ठेवला जाईल.