शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

हलव्याच्या दागिन्यांच्या किमतीत दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 05:37 IST

शाहीहार, मंगळसूत्र, कर्णफुले, नथ आकर्षण : दागिन्यांना मागणी जास्त मात्र कारागिरांची कमतरता

जान्हवी मोर्ये डोंबिवली : लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीच्या सणाला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे हलव्याच्या दागिन्यांना मागणी जास्त आहे. मात्र, हे दागिने तयार करणारे कारागीर आता उरलेले नाहीत. परिणामी, मागील वर्षांच्या तुलनेत दागिन्यांच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे.

मकरसंक्रांतीला सून, जावई आणि लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक केले जाते. सुनेसाठी सौभाग्यसेट, वाकीजोड (बाजूबंद), बांगडीजोड, पाटलीजोड, शाहीहार, कमरपट्टा, अंगठी, मंगळसूत्र (एकेरी), मंगळसूत्र (दुहेरी), मेखला, कर्णफुले (भोकर), मोठा मुकुट, बिंदी, एकपदरी हार, दोनपदरी हार, चापाची नथ (मोठी), चापाची नथ (लहान) इत्यादी दागिने उपलब्ध आहेत. जावयांसाठी एकपदरी हार, दोनपदरी हार, सजवलेला हत्ती, नारळ, गुलाब परडी, घड्याळ, मोबाइल इत्यादी वस्तू हलव्याच्या दागिन्यांमध्ये उपलब्ध आहेत.महिलांचे दागिने ८० रुपयांपासून ६५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. पुरुषांचे दागिने २०० ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. लहान मुलांसाठीचे दागिने १०० ते ४५० रुपयांच्या घरात आहेत. हलव्याच्या दागिन्यांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. परंतु, त्यासाठी कारागीर पूर्वीसारखे उरले नाहीत. जुन्या पिढीतील काही महिला हे दागिने तयार करत असल्याने ते बाजारात उपलब्ध होत आहेत. यंदाच्या वर्षी या दागिन्यांच्या किमती दुपटीने वाढल्या असल्याचे दागिनेविक्रेते श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले.लहान मुलींसाठी स्पेशल तारासेटलहान मुलांसाठी रंगीत वाडीसेट, सोनेरी वाडीसेट आणि लॉकेट, तर मुलींसाठी स्पेशल तारासेट उपलब्ध आहे. त्यात कमरपट्टा, हेअरबॅण्ड मुकुट, वाकी, बांगडीजोड, लॉकेट, पैंजण इत्यादी वस्तू बाजारात आल्या असून, त्या आकर्षण ठरत आहेत.

टॅग्स :thaneठाणे