शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

प्राषी फार्मातील औषध उत्पादन थांबविले

By admin | Updated: December 21, 2015 01:13 IST

शिरगाव येथील प्राषी फार्मास्युटीकल लिमिटेड या कंपनीच्या आवारातच औषध जाळल्याने व इटीपी प्लॅटमधून प्रदूषित पाणी सोडल्यानंतर निर्माण झालेल्या उग्र वासाने श्वसनाचा त्रास होत

हितेन नाईक, पालघरशिरगाव येथील प्राषी फार्मास्युटीकल लिमिटेड या कंपनीच्या आवारातच औषध जाळल्याने व इटीपी प्लॅटमधून प्रदूषित पाणी सोडल्यानंतर निर्माण झालेल्या उग्र वासाने श्वसनाचा त्रास होत असल्याच्या जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या तक्रारीवरून उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट यांनी या कंपनीचे उत्पादन थांबविले.या कंपनीच्या समोरील एका बंगल्यात जिल्हाधिकारी अभिजीत बांगर आपल्या कुटुंबासह राहतात. या भागात नेहमीच संध्याकाळपासून ते पहाटेपर्यंत उग्र वासाने नागरिकांना श्वसनाचा त्रास होणे, डोळे चुरचुरणे, पोटात मळमळ होणे इ. तक्रारी करण्यात आल्या होत्या. १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी बांगर यांनी फोन करून उपविभागीय अधिकारी दावभट यांना संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. उपविभागीय अधिकाऱ्याने याप्रकरणी तहसीलदार चंद्रसेन पवार व तारापूर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या दोन्ही अधिकाऱ्यांनी काही कंपन्यांची पाहणी करताना प्राषी फार्मास्युटीकलच्या शेडमधील पश्चिमेकडील भिंतीलगत टेबल कोटींग डक्टरमधून वायूगळती होऊन कंपनीच्या इटीपी (इन्फ्ल्युअंट) ट्रीटमेंट प्लँट)मधून प्रदूषित पाणी जाऊन निर्माण झालेल्या दलदलीमधून उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचत असल्याने कंपनीवर कारवाई करण्याचा अहवाल दोन्ही विभागाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यामुळे कंपनी जोपर्यंत टेबल कोटींग डक्टची गळती थांबवत नाही व इटीपी प्लँटमधील दूषित पाण्यावर प्रकिया करून त्याची नियमाप्रमाणे विल्हेवाट लावत नाही. तोपर्यंत या कंपनीमधील उत्पादन बंद करण्याचे आदेश दावभट यांनी दिले. या आदेशाचे पालन न केल्यास भारतीय दंडसंहिता १८६० ची ४५ मधील कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्याची नोटीस बजावली जाणार आहे.